मराठी रुपेरी पडद्यावर ‘आणीबाणी’

 मराठी रुपेरी पडद्यावर आणीबाणी

'आणीबाणीम्हटलं किती सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी असते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी असते. पण आता मात्र चिंता वाढवायला नाही तर कमी करायला मनोरंजनाची आणीबाणी लागू होणार आहे. लेखक अरविंद जगताप आणि दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी विनोदाची ही आणीबाणी प्रेक्षकांसाठी आणली आहे. उपेंद्र लिमयेप्रवीण तरडेसयाजी शिंदेसंजय खापरेवीणा जामकरउषा नाईकप्राजक्ता हनमघरसीमा कुलकर्णीरोहित कोकाटेसुनील अभ्यंकरपद्मनाभ बिंडकिशोर नांदलस्कर अशा मराठीतील अनेक दिग्गजांचा या आणीबाणीत सहभाग आहे. 'दिनिशा फिल्म्सनिर्मित आणीबाणी हा मराठी चित्रपट येत्या जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी वेगवेगळे मुद्दे चित्रपटातून आजवर मांडले आहेत. आता आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर नवरा बायकोच्या नात्याची हलकीफुलकी गोष्ट ते घेऊन आले आहेत. ही आणीबाणी कोणासाठी अडचण ठरणारआणि अडचणीत सापडलेले या आणीबाणीतून कसे बाहेर पडणार याची मनोरंजक कथा यात मांडण्यात आली आहे.

दिग्ग्ज कलाकारांची मोट एकत्र बांधत सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप मनोरंजनाची मिसळ आपल्याला चाखायला देणार आहेत. मनोरंजनाची ही मिसळ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास दिनेश जगताप व्यक्त करतात. 

कृष्णा जगतापयोगेश शिंदेसचिन जगतापअमोल महाडिक आणीबाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरनअवधूत गुप्तेआदर्श शिंदेसायली पंकजगणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजीआदित्य पटाईत,पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर कलादिग्दर्शन सुधीर सुतार यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. डी.आय,..किरण कोट्टा आणि मिक्स,.. नागेश राव चौधरी यांनी केले आहे. छायांकन मंगेश गाडेकर यांनी  केले असून या संकलन प्रमोद कहार यांचे आहे.  

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..