ओमरॉन हेल्थकेअर इंडिया...

ओमरॉन हेल्थकेअर इंडियाचा होम हार्ट मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट क्षेत्रात प्रवेश

दूरस्थ रुग्ण व्यवस्थापनासाठी ट्रायकॉगशी सहयोग

मुंबईएप्रिल 19, 2023 : ओमरॉन हेल्थकेअर कंपनी लिमिटेड ह्या होम हेल्थकेअर मॉनिटरिंग क्षेत्रातील अग्रेसर कंपनीच्या ओमरॉन हेल्थकेअर इंडिया ह्या भारतातील प्रादेशिक मुख्यालयाने दूरस्थ होम हार्ट मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट क्षेत्रात प्रवेशाची घोषणा केली आहेट्रायकॉग ह्या आघाडीच्या हार्ट हेल्थ एआय कंपनीशी ओमरॉन हेल्थकेअर इंडियाने भागीदारी केली आहेट्रायकॉग ही हृदविकारांचे लवकर निदान व व्यवस्थापन ह्यांवर लक्ष केंद्रित करणारी भारतीय बाजारपेठेतील कंपनी आहे.

ट्रायकेअर हा दूरस्थ रुग्ण व्यवस्थापन प्लॅटफॉर्म आणून देशातील कार्डिओव्हस्क्युलर विकारांच्या व्यवस्थापन परिसंस्थेत सुधारणा करणे हे ह्या प्रयत्नामागील उद्दिष्ट आहेह्या प्लॅटफॉर्मद्वारे ओमरॉनच्या कनेक्टेड देखरेख उपकरणांची सांगड ट्रायकॉगच्या एआयवर आधारित आरोग्यविषयक डेटा विश्लेषण क्षमतांशी घातली जाणार आहे.

ओमरॉन हेल्थकेअर इंडियाच्या न्यू बिझनेस अँड मार्केटिंग विभागांचे व्यवस्थापक कात्सुयुकी यामामोतोट्रायकॉग हेल्थचे संस्थापक  सीईओ डॉचरित भोगराज यांच्यासोबत

मूल्यविधान

हृदयविकारांवर घरच्या घरी देखरेख शक्य करणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ह्या सहयोगापुढे आहेत्याचप्रमाणे एआयच्या सहाय्याने वेळेत हस्तक्षेप करूनमृत्यू तसेच विकलांगतांना कारणीभूत ठरणाऱ्यातातडीच्या व पूर्तता न होणाऱ्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्याचेही उद्दिष्ट आहेह्यामध्ये लक्षणे व आजारांच्या निदानाला विलंब करणाऱ्या परिस्थितीचा (दुय्यम आरोग्यसेवा स्तरावरील रुग्णांसाठीसमावेश होतोह्या परिस्थितीमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये हार्ट फेल्युअरसारख्या कार्डिओव्हस्क्युलर घटना होऊ शकतात.

कार्डिओव्हस्क्युलर विकारांबाबतच्या पूर्तता  झालेल्या गरजा

कार्डिओव्हस्क्युलर आजारांमुळे (सीव्हीडीमृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येबाबत भारताचा क्रमांक जगात दुसरा आहे [1,2]. भारतातील चार पैकी एका प्रौढाला उच्च रक्तदाबाचा (हायपरटेन्शन) [3] त्रास असतो आणि त्यापैकी केवळ 22.5% रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात असतो [4]. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा धक्का बसण्याचा किंवा मायोकार्डिअल इन्फार्क्शन (एमआयहोण्याचापक्षाघाताचा झटका येण्याचा किंवा सेरेब्रोव्हस्क्युलर आघात होण्याचाअट्रियल फिब्रिलेशन (एएफतसेच हार्ट फेल्युअरचा धोका अधिक असतो.

भारतातील 40-69 ह्या वयोगटातील 45% लोकांना कार्डिओव्हस्क्युलर आजारांचा धोका आहे आणि एकूण मृत्यूंमध्ये ह्या विकारांनी होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 27% आहे.

भारतात हार्ट फेल्युअरचे प्रमाण वेगाने वाढत आहेया आजाराचे 1.3 ते 4.6 दशलक्ष रुग्ण असावेत असा अंदाज आहे  [5]. 1.8 दशलक्ष रुग्णांना दरवर्षी रुग्णालयात दाखल करावे लागतेतर 1 वर्षात मृत्यूचे प्रमाण सुमारे 40% आहेह्यापैकी 1 टक्क्याहून कमी रुग्णांना योग्य वैद्यकीय व्यवस्थापनाची सुविधा प्राप्त होतेत्यामुळे दूरस्थ पद्धतीने रुग्णांचे व्यवस्थापन करण्याच्या आवश्यकतेमध्ये मोठी संभाव्यता आहे [6].

लक्षणांचे नियमित मापनमहत्त्वाचे निकष व घरात ईसीजी काढण्याची सोय ह्यामुळे कार्डिओव्हस्क्युलर विकारांचे प्रमाण कमी होऊ शकतेमात्रईसीजी मापन उपकरणांची रुग्णालये व क्लिनिक्समधील कमतरताक्लिनिकल डेटाचा अर्थ लावणाऱ्या कार्डिओलॉजिस्ट्सची अनियमित उपलब्धता अशा विविध घटकांमुळे ह्यात अनेक आव्हाने आहेतत्याचप्रमाणे अधिक अचूक व वापरासाठी सुलभ अशा होम मॉनिटरिंग उपकरणांची आवश्यकता आहेघरच्या घरी ईसीजी नोंदवून घेणे देशात जवळपास अस्तित्वातच नाहीहायपर टेन्शनचे म्हणजेच उच्च रक्तदाबाचे रुग्ण सहसा त्यांच्या प्रकृतीबाबत बेसावध राहतातत्यामुळे  प्रकृती खालावत जाते किंवा एखाद्या गंभीरा विकाराचा आघात होतो.

आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी नवीन पद्धती निर्माण करणे:

  • ट्रायकेअर टीम रुग्णांना व त्यांची काळजी घेणाऱ्यांना हार्ट फेल्युअर व्यवस्थापनाबाबत शिक्षित करते आणि ओमरॉन बीपी मॉनिटर्सवजन तसेच ईसीजी मापन उपकरणांशी जोडलेले मोबाइल अॅप्लिकेशन (ओमरॉन कनेक्टकसे वापरायचे ह्याचेही शिक्षण देते.
  • दररोज ईसीजी घेण्यासोबतचघरातून लक्षणे नोंदवण्यासाठी तसेच महत्त्वाच्या खुणांचे मापन करण्यासाठीट्रायकेअर टीम रुग्णांना आभासी (व्हर्च्युअलपद्धतीने मदत करते.
  • ट्रायकॉगने स्वतविकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करूनटीम प्राणघातक स्थितींचे दूरस्थ निदान करण्याच्या दृष्टीने रुग्णाच्या नोंदींवर देखरेख ठेवते आणि डेटाचे विश्लेषण करतेत्याचप्रमाणे रुग्णालयाशी समन्वय साधून उपचार देतानाचजटीलता निर्माण होण्यापूर्वीच त्या टाळण्यासाठी कृती सुरू करते.

रक्तदाब व व्यक्तिगत आरोग्य देखरेख क्षेत्रात एआयवर आधारित विविध आरोग्यसेवा उपयोजनांमध्ये समन्वय साधल्यानंतरओमरॉनने आपले कार्यक्षेत्र होम हार्ट मॉनिटरिंग व व्यवस्थापन क्षेत्रांत विस्तारण्याच्या दृष्टीने टाकलेले हे आणखी एक लक्षणीय पाऊल आहेट्रायकॉगसारख्या योग्य सहयोगीची साथ मिळाल्यामुळेभारतीय कार्डिओव्हस्क्युलर आरोग्यसेवा क्षेत्रात आम्ही मोठा बदल घडवून आणू शकू अशी आशा आम्हाला वाटतेकारणघरच्या घरी ईसीजीचे मापन करणे आणि कार्डिओलॉजिस्टला सातत्याने माहिती देत राहणे ह्यामुळे सेरेब्रोव्हस्क्युलर आजारांचे प्रचलनपारंपरिक रुग्णालयकेंद्री ईसीजी मापन पद्धतीच्या तुलनेतनक्कीच कमी होऊ शकते असा विश्वास आम्हाला वाटतोह्यामुळे दीर्घकाळात वैद्यकीय-आर्थिक आधारावरील मोठे सामाजिक मूल्य राष्ट्रासाठी तयार होईलकारणह्या आजारांचे प्रचलन कमी झाल्यामुळे दरडोई आरोग्यसेवेवरील खर्चात मोठी कपात होईल, ” असे ओमरॉन हेल्थकेअर इंडियाच्या न्यू बिझनेस अँड मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक कात्सुयुकी यामामोतो सांगतात.

कार्डिओव्हस्क्युलर आजारांमुळे होणाऱ्या 19 दशलक्ष मृत्यूंपैकी 50 टक्के मृत्यूलवकर निदान व सुयोग्य व्यवस्थापन ह्यांमुळेटाळले जाऊ शकतातट्रायकेअर ह्या ओमरॉनच्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या पहिल्याच दूरस्थ रुग्ण व्यवस्थापन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक हृदयविकार रुग्णाच्या घरी आभासी कार्डिओलॉजिस्ट ठेवू शकतोजागतिक दर्जाची वैद्यकीय श्रेणी उपकरणे विकसित करण्याचा अनेक दशकांचा अनुभव ओमरॉनकडे आहे आणि जगातील लक्षावधी लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहेरुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी आमच्या जागतिक दर्जाच्या एआयचे पाठबळ लाभलेल्या  ट्रायकेअर प्लॅटफॉर्ममध्ये केवळ भारतातीलच नव्हे जगभरातील लक्षावधी आयुष्यांमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता आहे,” असे ट्रायकॉग हेल्थचे संस्थापक व सीईओ डॉचरित भोगराज सांगतात.

संदर्भ

  1. रोथ जीमेन्सा जीजॉन्सन सी आणि अन्यग्लोबल बर्डन ऑफ कार्डिओव्हस्क्युलर डिसीजेस अँड रिस्क फॅक्टर्स, 1990–2019. जे एएम कॉल कार्डिओल. 2020 डिसेंबर, 76 (25) 2982–3021.
  2. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (जागतिक आरोग्य संघटनाजागतिक आरोग्य सांख्यिकी 2016: मॉनिटरिंग हेल्थ फॉर द एसडीजीज सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन; 2016 जून 8.
  3. गेल्डसेट्झर पीमाने-गोहलर जेथीलमान एम आणि अन्यडायबिटीस अँड हायपरटेन्शन इन इंडिया: 1.3 दशलक्ष प्रौढांचा एक राष्ट्रीय स्तरावरील प्रानिधिक अभ्यासजेएएमए इंटर्न मेड.  2018;178(3):363‐372
  4. कोया एसएफपिलाक्कडवथ झेडचंद्रन पीविल्सन टीकुरियाकोज एसअकबर एसकेअली एहायपरटेन्शन कंट्रोल रेट इन इंडियासिस्टमॅटिक रिव्ह्यू अँड मेटा-अॅनालिसिस ऑफ पॉप्युलेशन-लेव्हल नॉन-इंटरव्हेन्शनल स्टडीज, 2001–2022. द लॅन्सेट रिजनल हेल्थसाउथईस्ट आशिया. 2023 फेब्रुवारी 1;9:100113.
  5. हफमनएमडीअँड प्रभाकरनडी. (2010). हार्ट फेल्युअरएपिडेमिओलॉजी अँड प्रिव्हेन्शन इन इंडियाद नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडिया, 23(5), 283.
  6. डोकायनिशएच., टिओके., झुजे., रॉय., अलहबिबकेएफ., एलसयद., ... अँड मोंदोसी. (2017). ग्लोबल मोरटॅलिटी व्हेरिएशन्स इन पेशंट्स विथ हार्ट फेल्युअरइंटरनॅशनल कंजेस्टिव हार्ट फेल्युअर (इंटर-सीएचएफसंभाव्य समूह अभ्यासद लॅन्सेट ग्लोबल हेल्थ, 5(7), e665-e672.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..