आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने 'अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी' पुस्तकाचे प्रकाशन

आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने 'अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी' पुस्तकाचे प्रकाशन

मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : 'आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी'ने सामान्य लोकांना अर्थसंकल्प कळावा यासाठी, 'अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रस्तावना लाभली आहे.
नुकताच राष्ट्रीय आणि राज्य अर्थसंकल्प जाहीर झाला. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर जे विश्लेषण केले जाते, ते सर्वसामान्यांना फारसे कळतेच असे नाही. केवळ, काय स्वस्त, काय महाग ही माहिती सर्वसामान्यांना समजते. मात्र, हा संपूर्ण अर्थसंकल्प सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. जगजीवन काळे लिखित या पुस्तकामुळे आता सर्वसामान्य लोकांपर्यंत अर्थसंकल्प सोप्या भाषेत पोहोचेल.
पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, 'काय स्वस्त आणि काय महाग, यापलीकडे सामान्य माणसाला अर्थसंकल्प समजावणारे हे पुस्तक आहे. हे पुस्तक आर्थिक साक्षरता वाढवेल. व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना अधिकाधिक पुस्तके वाचण्याची गरज आहे.'
अर्थसंकल्पाचा प्रत्येक व्यक्‍तीच्या आयुष्यावर काय परिणाम होणार, त्याच्या बचतीवर काय परिणाम होणार, किती आर्थिक भार वाढणार, आणि जाहीर झालेल्या योजना कितपत योग्य आहेत किंवा त्या तळागाळापर्यंत पोहोचतील का? याची चर्चा कुठं होताना दिसत नाही. हाच उद्देश ठेवून पुस्तकाचे निर्माते, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि पुस्तकाचे प्रकाशक मनोहर जगताप यांनी अर्थसंकल्पाचं सोप्या भाषेत विश्लेषण करण्यासाठी हे पुस्तक तयार केलं आहे. या अर्थसंकल्पाचं सोप्या भाषेत विश्लेषण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं यासाठी हे पुस्तक विनामूल्य ठेवण्यात आलं आहे.
आर्यन्स ग्रुपचे ईश्वर वाघमारे म्हणाले की, पुस्तक दिनाचे औचित्य साधून या आर्थिक साक्षरता वाढवणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन आम्ही आयोजित केले आहे. ही वाचकांसाठी आर्यन्स  ग्रुपकडून भेट आहे.
या प्रसंगी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसकर, पोलीस आयुक्त रितेशकुमार,‌ ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक यमाजी मालकर, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे आणि आर्यन्स ग्रुपचे मुकुंद जगताप, अजय जगताप, ईश्वर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Anand Rathi Share & Stock Brokers...