एनएसडीएलचे एसबीआय फाउंडेशनच्या सहकार्याने प्रोजेक्ट संजीवनी - क्लिनिक ऑन व्हील्स

एनएसडीएलचे एसबीआय फाउंडेशनच्या सहकार्याने प्रोजेक्ट संजीवनी - क्लिनिक ऑन व्हील्स सुरु

गरजू समुदायांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्यात येणार

मुंबई, 20 एप्रिल, 2023 : एनएसडीएल ने एसबीआय फाउंडेशनच्या सहकार्याने 31 मार्च रोजी एसबीआय कॉर्पोरेट सेंटरला मुंबईमध्ये फिरते वैद्यकीय युनिट-संजीवनी सुरू केले आहे. संजीवनी हे सर्वात वंचित समुदायांना प्रतिबंधात्मकउपचारात्मकसंदर्भ आणि निदानात्मक आरोग्य सेवा प्रदान करणारे क्लिनिक आहे. 'डॉक्टर्स फॉर यूया स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून संजीवनी हा प्रकल्प राबविला जात आहे.

या मोबाईल मेडिकल युनिट्सद्वारेएनएसडीएल चे उद्दिष्ट मुंबई (महाराष्ट्र)बक्सा (आसाम) आणि हरदोई (उत्तर प्रदेश) या तीन ठिकाणी गरजू समुदायांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. मुंबईतील प्रोजेक्टचा उद्देश धारावीगोवंडीसायन आणि कुर्ला इत्यादी शहरी झोपडपट्ट्यांमध्ये गरजू लोकांना त्यांच्या घरोघरी जाऊन निदान आणि उपचारात्मक आरोग्य सेवा प्रदान करणार आहेत . नीति आयोगाने अधिसूचित केलेल्या हरदोई आणि बक्सा या महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्येहा प्रकल्प ग्रामीण तसेच आदिवासी भागात आरोग्य सेवा प्रदान करेल.

प्रत्येक युनिट प्रत्येक ठिकाणी अंदाजे 20000 लाभार्थ्यांना सेवा देण्यासाठी सुसज्ज आहे. एकूण तीनही ठिकाणी वर्षभरात सुमारे 60000 लाभार्थ्यांना सेवा देण्याची तरतूद आहे.

याप्रसंगी बोलताना एनएसडीएलच्या एमडी आणि सीईओ श्रीमती पद्मजा चुंदुरू म्हणाल्याएनएसडीएल ला या संजीवनी उपक्रमासाठी एसबीआय सारख्या प्रतिष्ठित संस्थेशी जोडल्याचा अभिमान वाटतो. हा प्रकल्प केवळ ग्रामीण जनतेला प्रथमोपचार बरोबर भारतातील दुर्गम खेड्यांमध्ये आरोग्य सुधारेल. ग्रामीण आणि दुर्गम समुदायांना सेवा देण्यासाठी या प्रकल्पाचा देशातील इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तार करण्याचे एनएसडीएलचे उद्दिष्ट आहे.

प्रकल्प संजीवनीअसा प्रकल्प आहे जिथे आरोग्य सेवा पोहचु शकत नाही अशा भागात प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणार आहोतहे आमच्या सीएसआर प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे आहे. एसबीआय फाउंडेशनचे एमडी आणि सीईओ श्री संजय प्रकाश म्हणाले कीमला अशा ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या प्रकल्पामुळे आनंद होत आहे. एनएसडीएल ने धोरणात्मकदृष्ट्या ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी प्रकल्प राबविण्यासाठी आमच्याशी हातमिळवणी केली आहे.

 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..