शेतकरीच नवरा हवा सोम ते शनि संध्या. ६.३० वा. कलर्स मराठीवर...!

 हरहुन्नरी रेवा !

शेतकरीच नवरा हवा सोम ते शनि संध्या. ६.३० वा. कलर्स मराठीवर!

मुंबई 28 एप्रिल, २०२३ - कलर्स मराठीवर सुरू असलेली शेतकरीच नवरा हवा मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिका अत्यंत महत्वाच्या विषयावर आधारित आहे. जिथे मुलींना शेतकरी नवरा नको असतो, शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी पण मुलगी द्यायला तयार नाही तिथे एका उच्चभ्रू घराण्यातील शहरी, सुशिक्षित मुलगी, जेव्हा म्हणते मला “शेतकरीच नवरा हवा” तेव्हा काय होईल ? ते आपल्याला कळेलच. मालिकेचे शूट सातारला सुरू आहे. रेवाची भूमिका साकारणारी ऋचाचे आपण अनेक व्हिडिओ, रील सोशल मीडियावर बघतो. ज्यामध्ये कधी गायनाचा रियाज करत असते तर कधी चित्र काढत असते. सेटवर मिळालेल्या वेळेमध्ये ती आपले छंद जोपासते.  याविषयी बोलताना ती म्हणाली...

"मी गेल्या सात वर्षांपासून गाणं गाते आहे. आधी मी शास्त्रीय संगीत शिकले. माझ्या गुरू माधुरी नाईक त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकताना त्यांना असं जाणवलं की माझा आवाज वेगळा आहे, थोडं वेगळ्या कलेने घेतलं पाहिजे... तेव्हा त्यांनी मला Fuzion कडे जाण्यासाठी motivate केलं. आणि आम्ही दोघींनी माझ्या शैलीवर काम करून माझी स्टाईल तयार केली. लहापणापासूनच मला खूप आवड होती मग ते गाणं असो डान्स असो अक्टिंग असो. जेव्हा शेतकरीच नवरा हवा मालिकेसाठी विचारणा झाली तेव्हा उत्सुकता होती पण भीती पण होती कारण कधीच कॅमेरा फेस नव्हता केला... प्रत्येक दिवशी नवं आव्हानं असतं आणि तीच गंमत आहे असं मला वाटतं... मी खूप नशीबवान आहे की मला ही संधी मिळाली. Painting बद्दल सांगायचं झालं तर माझ्या पहिल्या गुरू जयवंती प्रभूतेंडुलकर... ज्यांनी मला paint brush कसा धरायचा हे शिकवलं ... नंतर मी ११ वी आणि १२ वी मध्ये  fine arts घेतलं. आणि मग तिथून प्रवास सुरू झाला आणि मी abstract creative painting शिकले. माझ्या गुरूंचे आभार ज्यांनी मला हे सगळं शिकवलं.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..