अभिनेते शंतनू मोघे परतले “सफरचंद” मध्ये

अभिनेते शंतनू मोघे परतले सफरचंद मध्ये

सरगम + अमरदीप निर्मित, कल्पकला प्रकाशित, निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या “सफरचंद” या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुजरातीतल्या प्रसिद्ध लेखिका स्नेहा देसाई यांच्या मूळ ‘सफरजन’ नाटकाचे रूपांतर मराठीत मुग्धा गोडबोले यांनी “सफरचंद” या नावाने केले असून राजेश जोशी यांनी कमालीचे दिग्दर्शन केले आहे. एक वेगळा विषय या नाटकात मांडला असून सर्वधर्म समभाव हा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. एक भव्य दिव्य नाट्यनिर्मिती म्हणून या नाटकाने रंगभूमीवर कमाल केली आहे. हुबेहूब काश्मीर प्रत्यक्षात रंगमंचावर अवतरला असून फिरता रंगमंच, भव्य नेत्रसुखद नेपथ्य, त्या वातावरणाला साजेसं मधुर संगीत ही या नाटकाची उल्लेखनीय बाजू आहे. या नाटकातील उत्कृष्ट अभिनयामुळे अभिनेते शंतनू मोघे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून संजय जामखंडी, प्रमोद शेलार, अमीर तडवळकर, रूपेश खरे, अक्षय वर्तकराजआर्यन कासुर्डे या कलाकारांनीही चोख भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाला आत्तापर्यंत म. टा. सन्मान सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना भौतेश व्यास, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत सचिन जिगर, सर्वोत्कृष्ट नेपथ्य संदेश बेंद्रे तसेच अशोक मुळये यांचा माझा पुरस्कार सर्वोत्कृष्ट नेपथ्य संदेश बेंद्रे, सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता शंतनू मोघे या पुरस्काराने गौरविले असून सांस्कृतिक कलादर्पणची सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजेश जोशी, सर्वोत्कृष्ट अभिनेता शंतनू मोघे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शर्मिला शिंदे, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता संजय जामखंडी, सर्वोत्कृष्ट लेखक स्नेहा देसाई, सर्वोत्कृष्ट नेपथ्य संदेश बेंद्रे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा राजेश परब, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना भौतेश व्यास, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत सचिन जिगर, सर्वोत्कृष्ट वेशभूषा तारा देसाई अशी ११ नामांकन मिळाली आहेत.

सांगायच तात्पर्य असं की, या नाटकातील मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता शंतनू मोघे यांचा धुळ्यामध्ये एका महानाट्याच्या प्रयोगा दरम्यान त्यांच्या पायाला मार लागून पाय फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी त्यांना एक महिना आराम करण्यास सांगितले. शो मस्ट गो ऑन या उक्तीप्रमाणे अचानक आलेल्या या प्रसंगाशी हार न मानता व ३१ मार्चचा बोरिवली येथील पूर्वनियोजित प्रयोग रद्द न करता शंतनू मोघे यांनी वॉकरच्या सहाय्याने हा प्रयोग सादर केला. पायाला फ्रॅक्चर झालेलं असतानाही हातात वॉकर घेऊन त्यानं नाटकाचा संपूर्ण प्रयोग केला आणि प्रेक्षकांनीही या प्रयोगाला टाळ्यांच्या कडकडात दाद दिली. नंतर शंतनू मोघे यांच्या जागी दूसरा अभिनेता घेऊन या नाटकाचे प्रयोग निर्मात्यानी सुरू ठेवले. पण आता तब्बल एक महिन्यानंतर शंतनू मोघे पूर्णपणे बरा होऊन या नाटकात परतला आहे. या नाटकाचा पुढील प्रयोग १ मे रोजी दुपारी ३.३० वाजता शिवाजी मंदिर येथे होणार असून पुढील सर्व प्रयोगात शंतनू मोघे अभिनय करताना दिसणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..