एसबीआय लाइफच्या ‘थँक्स अ डॉट’ उपक्रमाद्वारे आणखी एक नाविन्यपूर्ण, जीवरक्षक साधन लाँच..

एसबीआय लाइफच्या ‘थँक्स अ डॉट’ उपक्रमाद्वारे आणखी एक नाविन्यपूर्ण, जीवरक्षक साधन लाँच, स्तनांची स्व- तपासणी करण्याचे आणि वेळेवर निदान होण्याचे महत्त्व ठसवणार वेळेवर निदान होण्यासाठी स्तनांच्या स्व- तपासणीविषयी जागरूकता पसरवण्यासाठी कंपनीतर्फे महिमा चौधरी यांच्याशी सहकार्य 

भारत, १० ऑक्टोबर २०२३ – ऑक्टोबर महिन्यात स्तनांच्या कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. या निमित्ताने प्रत्येक स्त्रीला आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि नियमितपणे स्तनांची स्व- तपासणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या महत्त्वाच्या महिन्याच्या निमित्ताने एसबीआय लाइफ इन्शुरन्सने आणखी एका दीर्घ प्रवासाची सुरुवात केली असून त्यासाठी ‘थँक्स अ डॉट’ हा उपक्रम आखण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांना स्तनांची स्व- तपासणी करण्याची सवय लावण्यासाठी मदत केली जाणार आहे. 

या उपक्रमाचा एक भाग म्हणून एसबीआय लाइफने स्तनांच्या स्व- तपासणीसाठी हॉट वॉटर बॅग हे नाविन्यपूर्ण साधन विकसित केले आहे, जे एरवी देशभरातील स्त्रियांद्वारे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. गरम पाण्याच्या पिशवीच्या डिझाइनमध्ये थोडासा बदल करून पुढच्या बाजूस गाठ कोरण्यात आली आहे. त्यामुळे स्त्रियांना स्व- तपासणीदरम्यान स्तनांच्या कर्करोगाची गाठ कशी जाणवू शकते याचा अनुभव मिळतो. या साधनामुळे भारतीय स्त्रियांना स्तनांची स्व- तपासणी करण्याची सवय लावून घेण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण मिळेल आणि वेळेवर निदान होण्याचे महत्त्वही त्यांच्या लक्षात येईल. 

गेल्या काही वर्षांत प्रगती झालेली असली, तरी स्तनांच्या कर्करोगाविरूद्धचा लढा संपलेला नाही. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार २५ ते ५० वर्ष वयोगटातील तरुण भारतीय स्त्रियांमधील स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. दुर्देवाने यातील ६० टक्के केसेस पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर समोर येतात व त्यामुळे जीव वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी होते. मात्र, वेळेवर निदान झाल्यास स्तनांचा कर्करोग झालेल्या ९८ टक्के रुग्णांचा जीव वाचू शकतो. यावरून स्तनांच्या कर्करोगाविरोधात लढा देताना नियमितपणे स्व- तपासणी हे सर्वात महत्त्वाचे शस्त्र असल्याचे लक्षात येईल. 

मात्र, हा लढा एकट्याने देता येणार नाही. एसबीआय लाइफ इन्शुरन्सने कायमच समाजात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी काम केले असून इतर संस्थांनाही या कामात सहभागी होण्यासाठी कंपनी आमंत्रित करत आहे. खास पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या बॅग्जचे उत्पादन करून ग्राहक, कर्मचारी इत्यादींना त्याचे मोफत वाटप करण्याच्या कामात संस्थांना भाग घेता येईल. भारतीय स्त्रियांना नियमितपणे स्व- तपासणीची सवय लागण्यासाठी हे जीवरक्षक साधन प्रत्येक घराघरात पोहोचणे गरजेचे आहे. 

थँक्स अ डॉट किट ऑर्डर करण्यासाठी किंवा या चळवळीत सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://www.sbilife.co.in/thanksadot 

स्तनांची स्व- तपासणी करण्याची गरज किती तीव्र झाली आहे, हे स्पष्ट करताना एसबीआय लाइफ इन्शुरन्सच्या कॉर्पोरेट आणि सीएसआर विभागाचे ब्रँड प्रमुख श्री. रवींद्र शर्मा म्हणाले, ‘गेल्या काही काळात स्त्रियांना आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांच्या तुलनेत आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व समजायला लागले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यापैकी कित्येक जणींना आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नेमके काय करायचे हे माहीत नसते. आजच्या युगातील स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले असून स्त्रियांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आणि स्तनांची स्व- तपासणी करणे महत्त्वाचे झाले आहे. स्तनांच्या स्व- तपासणीच्या गरजेविषयी जागरूकता पसरवण्याची तीव्र गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या एसबीआय लाइफच्या थँक्स अ डॉट या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचत स्त्रियांना नियमित सवय लावण्याचा अनोखा मार्ग सापडला आहे. प्रत्येक घरात असणाऱ्या गरम पाण्याच्या पिशवीसारखे हे साधन स्त्रियांना स्तनांची नियमित तपासणी करण्याचे प्रशिक्षण देईल.’

DVC पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.youtube.com/watch?v=4RtSa9C2lEQ   

भारतीय अभिनेत्री आणि कॅन्सर सर्व्हायव्हर महिमा चौधरी म्हणाल्या, ‘ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायव्हर या नात्याने वेळेवर या आजाराचे निदान होण्याचे महत्त्व आणि त्याचा आयुष्यावर होणारा परिणाम यांची मला कल्पना आहे. एसबीआय लाइफचा थँक्स अ डॉट हा उपक्रम स्त्रियांना स्तनांची स्व- तपासणी करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांनी सक्षम करणारा आहे. भारतात कित्येक स्त्रियांना आपल्याला स्तनांचा कर्करोग झाल्याचे खूप उशीरा कळते आणि हे वास्तव बदलण्यासाठी हे अभियान खूप महत्त्वाचे ठरेल.'

देन्त्सु क्रिएटिव्हच्या डिजिटल एक्सपिरीयन्सचे अध्यक्ष साहिल शहा म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत थँक्स अ डॉट या उपक्रमाने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने स्तनांची स्व- तपासणी करण्याचे प्रशिक्षण देत, त्याची सवय रूजवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. या वर्षी आम्ही भारतातील स्त्रियांतर्फे नेहमी वापरले जाणाऱ्या एका साधाचा वापर करून त्यांना हे जीवरक्षक तंत्र शिकवण्याचे ठरवले आहे. हग ऑफ लाइफ या प्रकल्पाच्या मदतीने आम्ही प्रत्येक भारतीय स्त्रीला स्व- परीक्षण करण्याची नियमित सवय लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून एसबीआय लाइफ ग्रामीण भारतात शैक्षणिक कार्यशाळांचे आयोजन करून स्तनांच्या कर्करोगाविषयी सामाजिक- सांस्कृतिक अडसर दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. स्तनांच्या कर्करोगाविरोधात लढा देण्यासाठी सोपे तंत्र स्त्रियांना शिकवण्यासाठीही सक्रिय प्रयत्न केले जाणार आहेत. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..