दिल दोस्ती आणि दिवानगी..

दिल दोस्ती आणि दिवानगी

नवे मित्र मैत्रिणीनव्या ओळखीमजामस्तीउत्साह आणि उन्माद म्हणजे कॉलेजलाईफ. दिल दोस्ती दिवानगी' सगळं तिथं अनुभवायला मिळतं. ही सगळी धमाल आपल्याला दिल दोस्ती दिवानगी' या चित्रपटातून येत्या १३ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत पहायला मिळणार आहे. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या दिल दोस्ती दिवानगी चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

मैत्रीच्या नात्याचा वेध आणि प्रेमाच्या नात्यातील गुंतागुंत दाखवणारा हा चित्रपट आहे. काही अनपेक्षित घटनांमुळे बदलत जाणारे नात्याचे रंग आणि प्रेमाचा प्रवास कोणत्या वळणांनी  घडत जातो याची रंजक कथा ‘ दिल दोस्ती दिवानगी’  हा चित्रपट उलगडतो.  कश्यप परुळेकरवीणा जगतापचिराग पाटीलस्मिता गोंदकर,  अतुल कवठळकर,  तीर्था मुरबाडकरतपन आचार्यदुर्वा साळोखेकंवलप्रीत सिंग या नव्या दमाच्या तरुण कलाकारांची फळी यात पहायला मिळतेय. सोबत प्रदीप वेलणकरविजय पाटकरस्मिता जयकरविद्याधर जोशी,  सुरेखा कुडची यांसारख्या अनुभवी आणि मात्तब्बर कलाकारांची साथ त्यांना मिळाली आहे.  वेगवेगळ्या जॉंनरची तीन गाणी दिल दोस्ती दिवानगी या चित्रपटात आहेत.  अवधूत गुप्ते,  वैशाली सामंत,सोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. सोनाली उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे.

'दिल दोस्ती दिवानगी चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तर संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. कथापटकथासंवाद दीपक तारकर यांचे आहेत. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचा,इ.सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत.  नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकूर आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..