जागतिक आर्थरायटीस दिनी वोक्हार्ट रुग्णालयात अत्याधुनिक स्ट्रायकर मॅको रोबोटीक्स तंत्रज्ञान दाखल

जागतिक आर्थरायटीस दिनी वोक्हार्ट रुग्णालयात अत्याधुनिक स्ट्रायकर मॅको  रोबोटीक्स तंत्रज्ञान दाखल

(या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे  संपूर्ण गुडघा बदल शस्त्रक्रिया, खुबा बदल शस्त्रक्रिया आणि  अंशत: गुडघा बदल शस्त्रक्रिया करता येणार. अशा प्रकारचे तंत्रज्ञान असलेले दक्षिण मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालय हे पहिले रुग्णालय)

मुंबई ऑक्टोबर 11, 2023 -  जागतिक आर्थरायटिस दिनी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञान  स्ट्रायकर मॅको रोबोटीक्स तंत्रज्ञान आपल्या सेवेत दाखल करून घेतले आहे. गुडघा आणि खुबा बदल शस्त्रक्रिया अत्यंत कुशलतेने पार पाडण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होणार असून या तंत्रज्ञानामुळे रुग्णसेवा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणे रुग्णालयाला शक्य होणार आहे. 

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयाने स्ट्रायकर मॅको रोबोट, हे गुडघा आणि खुबा बदल शस्त्रक्रियेसाठीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान अंगीकारले आहे. हे तंत्रज्ञान उपलब्ध असलेले या परिसरातील वोक्हार्ट रुग्णालय हे एकमेव रुग्णालय आहे. या तंत्रज्ञानामुळे गुडघा आणि खुबा बदलासाठीच्या शस्त्रक्रियेसाठी सीटी इमेज उपलब्ध होतात, ज्यामुळे शस्त्रक्रिया करतेवेळी गरजेची असलेली अचूकता मिळवणं शक्य होतं. या तंत्रज्ञानामुळे शल्यचिकीत्सकांना अचूकतेसोबतच उत्तम नियंत्रणही मिळतं. अचूकता आणि उत्तम नियंत्रणामुळे स्नायू, उतींना फारशी इजा होत नाही ज्यामुळे ही शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित होते. हे तंत्रज्ञान वापरल्याने रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारण्यास मदत होते हे विशेष. रुग्णांना लवकर आराम पडावा ते पूर्वीप्रमाणे तंदुरुस्त व्हावेत हा वोक्हार्ट रुग्णालयाचा सातत्याने प्रयत्न असतो आणि त्यासाठी सातत्याने नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले जात असतात. 

डॉक्टर डरमाँट कोलोपी हे ऑस्ट्रेलियातील पर्थमधल्या सेंट जॉन ऑफ गॉड या खासगी रुग्णालयातील सल्लागार डॉक्टर असून त्यांच्या देखरेखीखाली या तंत्रज्ञानाचा वापर करत पहिल्या काही शस्त्रक्रिया केल्या गेल्या. वोक्हार्ट रुग्णालयातील डॉक्टरांना या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, या तंत्रज्ञानाच्या मदतीने शस्त्रक्रिया करता याव्यात यासाठी डॉक्टर डरमाँट कोलोपी यांच्या देखरेखीखाली मॅको रोबोटीक आर्मच्या मदतीने सांधा बदलाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.  दक्षिण मुंबईमधील रुग्णालयात  या तंत्रज्ञानाचा वापर करून सांधा बदलाच्या करण्यात आलेल्या या पहिल्याच शस्त्रक्रिया आहेत. 

'मॅको स्मार्ट रोबोटीक्स' ही गुडघा आणि खुबा बदल शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी सुरक्षित आणि अचूक पद्धती मानली जाते. हाडाचा निकामी झालेला भाग काढून टाकताना उर्वरीत हाडाला आणि उतींना इजा होणार नाही अशा रितीने शस्त्रक्रिया करणे या तंत्रज्ञानामुळे शक्य होतं.  या तंत्रज्ञानासाठी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला तुलनेने कमी वेदना होतात. त्याची प्रकृती झपाट्याने सुधारते, रुग्णालयातील त्याच्या वास्तव्याचा कालावधीही कमी होतो, रक्तपातही फार होत नाही आणि शस्त्रक्रियेसाठी दिली जाणारी चीरही फार मोठी नसते. यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया करण्याचा जगभरातील डॉक्टर सल्ला देत असतात. या तंत्रज्ञानाची सगळ्यात प्रभावी गोष्ट 'अॅक्युस्टॉप' नावाची प्रणाली आहे.  यामुळे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर हाड अत्यत बारकाईने कापू शकतात, कृत्रिम सांधे अचूकतेने योग्य जागी ठेवू शकतात आणि शस्त्रक्रियेदरम्यान उतींना फार इजा होत नाही. 

जगभरात या तंत्रज्ञानाची उपकरणे 1500 हून अधिक ठिकाणी उपयोगात आणण्यात आली आहेत.  या उपकरणांद्वारे जगभरात 10 लाखांहून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या उपकरणावरील 350 हून अधिक परीक्षण लेख प्रकाशित झाले आहेत.   मॅको रोबोटीक्स आर्म तंत्रज्ञान हे हाडांसाठीच्या उपचारासाठीचे अग्रस्थानी असलेले तंत्रज्ञान आहे. असे हे तंत्रज्ञान रुग्णसेवेत दाखल करून घेताना मुंबई सेंट्रलस्थित वोक्हार्ट रुग्णालयाला अत्यंत आनंद होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाची रुग्णसेवा देणे हे वोक्हार्ट रुग्णालयाचे सातत्याने ध्येय राहिले असून या तंत्रज्ञानाचा अवलंब हे त्याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.

वोक्हार्ट रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका झहाबिया खोराकीवाला यांनी मॅको रोबोटीक आर्म रुग्ण सेवेत दाखल करत असल्याची घोषणा करताना म्हटले की, "नवे, आधुनिक तंत्रज्ञान वापरून रुग्णांना त्रासातून लवकर बरे करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो, या तंत्रज्ञानाचा अवलंब हा त्याचाच एक भाग आहे. अत्यंत कुशल शल्यचिकीत्सकांची टीम, शस्रक्रियेनंतरचा रुग्णालयातील रुग्णाचा कमी कालावधी  आणि रिहॅ8ब केअरच्या सुसज्जतेसोबतच  माको रोबोटीक आर्ममुळे मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट रुग्णालय रुग्णांना सर्वोत्कृष्ट सेवा देत आहे. सांधे आणि हाडांच्या व्याधींच्या रुग्णांवर उपचारासाठी हे रुग्णालय हे सर्वोत्कृष्ट बनले आहे."

हे आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारल्यानंतर स्ट्रायकर मॅको रोबोटिक आर्म-असिस्टेड सर्जिकल सिस्टीम वापरून गुडघ्याच्या आणि सांध्याच्या शस्त्रक्रिया करणे हे मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट रुग्णालयाचे ध्येय आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

“Mother’s Day” was celebrated with Mommy Bloggers & their Kids..