‘शार्प शूटर’ विशाखा..

 शार्प शूटर विशाखा

अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या त्यांच्या बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. हातात गन घेतलेलं त्यांचं बेअरिंग आणि वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा 'शूटरची  व्यक्तिरेखा  त्या साकारताना दिसतील. त्यांचा हा शूटर अंदाज आगामी एकदा येऊन तर बघा  या चित्रपटातला आहे. या चित्रपटात विशाखाने मगरु’ या शार्प शूटर’ ची भूमिका साकारली असून यात त्या 'डॅशिंग रावडी लूकमध्ये दिसणार आहेत.

या भूमिकेबद्दल बोलताना विशाखाने सांगितलं कीही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअपबॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असलीतरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं त्या सांगतात.  येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित  'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटरराजेशकुमार मोहंतीदिपक क्रिशन चौधरीसेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभनसत्यनारायण मूरथीडॉ.झारा खादर यांची आहे. 

विशाखा सोबत गिरीश कुलकर्णीसयाजी शिंदेभाऊ कदमतेजस्विनी पंडितपॅडी कांबळेओंकार भोजनेप्रसाद खांडेकर,  राजेंद्र शिसातकर,  नम्रता संभेराववनिता खरातशशिकांत केरकर,  रोहित मानेसुशील इनामदारआदि चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे.  विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..