ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍सकडून ई२गो इलेक्ट्रिक स्‍कूटरसाठी ग्रॅफिन व्‍हेरिएण्‍ट लाँच

ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍सकडून ई२गो इलेक्ट्रिक स्‍कूटरसाठी ग्रॅफिन व्‍हेरिएण्‍ट लाँच 

मुंबईऑक्‍टोबर १२०२३: ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍स या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या प्रिमिअम इलेक्ट्रिक वेईकल उत्‍पादक कंपनीने त्‍यांच्‍या ई२गो इलेक्ट्रिक स्‍कूटरसाठी ग्रॅफिन व्‍हेरिएण्टच्‍या लाँचसह नवीन बेंचमार्क स्‍थापित केला आहे. स्‍वदेशी उत्‍पादित करण्‍यात आलेली ग्रॅफिन ई२गो ६३,६५० रूपये* (एक्‍स-शोरूम अहमदाबाद) या सुरूवातीच्‍या आकर्षक किमतीमध्‍ये पदार्पण करत आहे. 

ओडीसीची ई२गो ग्रॅफिन इलेक्ट्रिक स्‍कूटर प्रतिचार्ज १०० किमीची प्रभावी रेंजकीलेस इलेक्ट्रिक स्‍टार्ट सिस्‍टम आणि वाहन परवाना व नोंदणीशिवाय ड्रायव्हिंग करण्‍याची सोयीसुविधा देते. ई२गो ग्रॅफिन अद्वितीय प्रवास गरजांसह राइडर्सच्या रेंजसंदर्भातील गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. इकोनॉमिक सुसंगता व वैविध्‍यपूर्ण रेंजसह ई२गो आनंददायी राइडिंग अनुभव देते. प्रत्‍येक राइडरच्‍या स्‍टाइलला जुळून जाण्‍यासाठी ही वेईकल मॅट ब्‍लॅककॉम्‍बॅट रेडस्‍कार्लेट रेडटील ग्रीनअझुरे ब्‍ल्‍यू व कॉम्‍बॅट ब्‍ल्‍यू या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. 

ई२गोची नवीन लाँच करण्‍यात आलेली ग्रॅफिन बॅटरी आरामदायी व विश्‍वासार्ह प्रवासाची खात्री देते. ही बॅटरी ८ तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते. इतर वैशिष्‍ट्ये जसे यूएसबी चार्जिंगअॅण्‍टी-थेफ्ट लॉक व कीलेस एण्‍ट्री डिजिटल स्‍पीडोमीटर या वेईकलला सर्वसमावेशक व युजर-अनुकूल निवड बनवतात. आपला दर्जा कायम राखत ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍स वेईकलवर व्‍यापक तीन-वर्षांची वॉरंटी देत आहेज्‍यामधून आगामी काळासाठी विनासायास राइडची हमी मिळते.

याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍स प्रा. लि.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. नेमिन वोरा म्‍हणाले, ''ई२गो साठी ग्रॅफिन व्‍हेरिएण्‍टमधून इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील नाविन्‍यतादर्जा व किफायतशीरपणाबाबत आमची कटिबद्धता दिसून येते. आमचा भारतीय राइडर्सना परिवहनाच्‍या शाश्‍वत व डायनॅमिक मोडसह सक्षम करण्‍यावर विश्‍वास आहेजे स्‍टाइल किंवा कार्यक्षमतेसंदर्भात तडजोड करत नाही आणि किफायतशीर दरामध्‍ये उपलब्‍ध आहे.'' 

हे उत्‍पादन आता ऑर्डरसाठी फ्लिपकार्टवर आणि कंपनीच्‍या अधिकृत डिलर्सकडे उपलब्‍ध आहे. ग्रॅफिन व्‍हेरिएण्‍टच्‍या सादरीकरणामधून ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍सची भारतीय ग्राहकांना नाविन्‍यपूर्णविश्‍वसनीय व किफायतशीर इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्धता अधिक दृढ होते.  

ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍स प्रा. लि. बाबत: 

मुंबई स्थित इलेक्ट्रिक वेईकल स्‍टार्ट-अप ओडीसी वोरा ग्रुप ऑफ कंपनीजचा भाग आहे. ऑल-इलेक्ट्रिक मोबिलिटी व्‍यासपीठाने ग्राहकांसाठी इंटेलिजण्‍ट अर्बन इलेक्ट्रिक मोबिलिटीच्‍या नवीन युगामध्‍ये प्रगती करण्‍याकरिता जगातील अग्रणी ई.व्‍ही. घटक उत्‍पादक व गतीशीलता तंत्रज्ञान स्‍पेशालिस्‍ट्ससोबत सहयोग केला आहे. कंपनीच्‍या इलेक्ट्रिक स्‍कूटर्स व बाइक्‍स तरूणांपासून वृद्धांपर्यंतफॅशनेबल खरेदीदार व आरामदायीपणाचा शोध घेणाऱ्यांपासून व्‍यस्‍त व्‍यावसायिक राइडर्सपर्यंत सर्वांसाठी उपलब्‍ध आहेत. प्रत्‍येक उत्‍पादन प्रखर टिकाऊपणा व विश्‍वासार्हता चाचण्‍यांचे पालन करते. ओडीसी प्रत्‍येक ग्राहकाला किफायतशीर दरामध्‍ये दर्जाआरामदायीपणा व स्‍टाइलचे सर्वसमावेशक पॅकेज देते. सध्‍याब्रॅण्‍ड उत्‍पादन पोर्टफोलिओमध्‍ये पुढील उत्‍पादनांचा समावेश आहे:-

  • इलेक्ट्रिक मोटरसायकल वेडर (७ इंच अँड्रॉईड डिस्‍प्‍लेआयओटीचार ड्राइव्‍ह मोड्स१८-लीटर्स स्‍टोरेज जागागुगल मॅप नेव्हिगेशन) 
  • इलेक्ट्रिक बाइक ईव्‍होकिस (चार ड्राइव्‍ह मोड्सकीलेस एण्‍ट्रीअॅण्‍टी-थेफ्ट लॉक आणि मोटर कट-ऑफ स्विच) 
  • इलेक्ट्रिक स्‍कूटर हॉक (क्रूझ कंट्रोल व म्‍युझिक सिस्‍टम असलेली भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्‍कूटर) 
  • ई२गोई२गो+ई२गो प्रो व ई२गो ग्रॅफिन (पोर्टेबल बॅटरीयूएसबी चार्जिंगडिजिटल स्‍पीडोमीटर आणि कीलेस एण्‍ट्री असलेली इलेक्ट्रिक स्‍कूटर) 
  • इलेक्ट्रिक स्‍कूटर व्‍ही२ आणि व्‍ही२+ (वॉटरप्रूफ मोटरव्‍यापक बूट स्‍पेसड्युअल बॅटरी आणि एलईडी लाइट्स)
  • लास्‍ट-माइल डिलिव्‍हरीसाठी इलेक्ट्रिक स्‍कूटर ट्रॉट (२५० किग्रॅची लोडिंग क्षमता आणि आयओटी)  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..