मोहितेंच्या घरात गोड बातमी येणार, राज कावेरी आई बाबा होणार..
मोहितेंच्या घरात गोड बातमी येणार,
राज कावेरी आई बाबा होणार..
पहा, 'भाग्य दिले तू मला', २ तासाचा विशेष भाग, महारविवार, १८ फेब्रुवारी, दु. १.०० वा. आणि संध्या. ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' या लोकप्रिय मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी जोडी एक गोड बातमी घेऊन येत आहे. रत्नमाला, राज, कावेरी यांच्या नव्या प्रवासात आता आणखी एक नवं वळण येणार आहे. ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला. राज कावेरी आई बाबा होणार आहेत. मोहिते कुटुंबात नवा सदस्य सामील होणार. ही बातमी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. ही प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहेच पण मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षक आता प्रश्नात पाडले आहेत. या प्रोमोमध्ये कावेरी राजला गुड न्यूज सांगण्यासाठी कॉल करते पण राज फोन बंद करून किमयाकडे देतो. आता कावेरी ही गुड न्युज राजला कशी सांगेल?
हे पाहण्यासाठी नक्की पहा, 'भाग्य दिले तू मला', २ तासाचा विशेष भाग, महारविवार, १८ फेब्रुवारी, दु. १.०० वा. आणि संध्या. ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
Comments
Post a Comment