गोदरेज अँड बॉयस..

गोदरेज अँड बॉयसतर्फे मुंबईतील पहिल्या ४०० केव्ही जीआयएस सबस्टेशनचा आरंभ करत उर्जा क्षेत्राला बळकटी

 कंपनीतर्फे १५००एमव्हीए क्षमतेसह मुंबईच्या उर्जा क्षमतेत वाढ

मुंबई१६ फेब्रुवारी २०२४ – शहरे आणि औद्योगिक क्षेत्रे विकसित होत आहेततशी विश्वासार्ह आणि शाश्वत उर्जेची मागणी वेगाने वाढत आहे. गोदरेज अँड बॉयस या गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपनीने गोदरेज इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या आपल्या व्यवसायातर्फे भारताच्या आधुनिक उर्जा पायाभूत सुविधांसाठी योगदान देण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या व्यवसायाने १३२केव्ही ते ७६५ केव्हीच्या रेंजमधील प्रकल्प पूर्ण केले असून सबस्टेशन्स क्षेत्रातील त्यांची सध्याची ऑर्डर बँक १७०० कोटी रुपये आहे.

कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्ये आठ सबस्टेशन्स सुरू केली असून त्यात मुंबईतील प्रतिष्ठित ४००केव्ही जीआयएस व्हर्टिकल सबस्टेशन्सचाही समावेश आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या उर्जा क्षमतेत १५०० एमव्हीएची भर पडली असून त्यामुळे उर्जेची मागणी मोठ्या प्रमाणावर पूर्ण केली जात आहे. मोठी शहरेईशान्य राज्ये आणि जम्मूसारखे आव्हानात्मक प्रदेश, गुजरातमधील खावडासारख्या मुख्य प्रादेशिक भागात विश्वासार्हवाजवी आणि शाश्वत उर्जा पायाभूत सुविधा पुरवत गोदरेज इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स उच्च क्षमता, अत्याधुनिक सबस्टेशन्सचे प्रकल्पांच्या भविष्याला आकार देत तसेच समांतरपणे देशातील उर्जा आव्हानांवर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

गोदरेज इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख राघवेंद्र मिरजी म्हणाले, विश्वासार्हता आणि शाश्वतता यांच्याशी बांधिलकी जपत सबस्टेशन क्षेत्रात आम्ही केलेली प्रगती हे केवळ व्यावसायिक यश नाहीतर भारताच्या उर्जा स्वयंपूर्णतेला दिलेले मोठे योगदान आहे. मुंबईत पहिले ४०० केव्ही जीआयएस सबस्टेशन्स इन्स्टॉल करून शहराच्या उर्जा क्षमतेत १५०० एमव्हीए क्षमतेची भर घालण्यातून आम्ही केवळ सबस्टेशन उभारले नाहीतर मुबलक व हरित उर्जामय भविष्याचा पाया आम्ही रचला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उर्जेच्या वाढत्या मागण्यांचा मेळ घालत भारतात अधिक शाश्वत व प्रकाशमान भविष्य उभारण्याचे आमचे ध्येय आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला गोदरेज अँड बॉयसने अर्थसंकल्पावर आधारित निवेदन प्रसिद्ध करत सरकारच्या अक्षय उर्जा क्षेत्रातील क्षमतांचा विस्तार करून शाश्वततेवर लक्ष केंद्रित करण्याच्या भावनेचा पुनरूच्चार केला होता. गोदरेज इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिकस खासगी क्षेत्रातील कंपन्यांसह भागिदारी करून देशभरातील वैविध्यपूर्ण सबस्टेशन आणि अक्षय उर्जा प्रकल्पांमध्ये कार्यरत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO