सा रे ग म प 2024 चे मुंबई ऑडिशन्स 3 ऑगस्ट रोजी

सा रे ग म प 2024 चे मुंबई ऑडिशन्स 3 ऑगस्ट रोजी

सा रे ग म प 2024 मुंबई ऑडिशन्स || शनिवार, ऑगस्ट 3, 2024 || वेळ सकाळी 9 वाजल्यापासून स्थळः नाहर इंटरनॅशनल स्कूलनाहर्स अमृत शक्ती रोडडीपी रोड नंबर 2, चांदिवलीपवर्ईमुंबईमहाराष्ट्र 

झी टीव्हीवरील आयकॉनिक गायन रिअॅलिटी शो सा रे ग म प’ हा आता एका नव्या पर्वासह पुनरागमन करत आहे. ह्या शो ने गेल्या वर्षी दर आठवड्‌याला झी म्युझिक कंपनीसह मूळ सिंगल गाणी प्रदर्शित करण्याच्या संधीच्या माध्यमातून गायन क्षेत्रामध्ये अनेक उत्कृष्ट कलाकार निर्माण केले. आता हा शो आकर्षक नवीन फॉर्मेटसह परत येत आहे.

ह्यावेळेस स्पर्धकांना त्यांचे मेंटॉर्स सखोल मार्गदर्शन करतील आणि आपल्या ह्या शिष्यांच्या सांगितिक प्रवासामध्ये ते जातीने लक्ष देतील. स्पर्धात्मक वातावरणामध्ये संगीत क्षेत्रातील सर्वांत मोठे संगीतकार एकमेकांसोबत कडवी झुंज देत असताना ह्या सांगितिक सर्वोत्कृष्टतेला नवीन उंची मिळाली नाही तरच नवल.

सा रे ग म प 2024 तुमच्या शहरात येत आहे मुंबईमध्ये आपल्या ऑन ग्राऊंड ऑडिशन्ससाठी शनिवार 3 ऑगस्ट रोजीतेव्हा जर तुमचे वय 15 वर्षे किंवा त्यापुढील असेल तर ही संधी तुमची आहे. ऑडिशनच्या स्थळाला भेट द्या आणि आपली कला दाखवा. ऑनलाईन ऑडिशन्सना अगोदरच सुरूवात झाली आहे. तुम्हांला केवळ झी 5 ॲप डाऊनलोड करून त्यावरील बॅनरवर क्लिक करा आणि तुमच्या प्रवेशिका पाठवा किंवा 8291829134 वर मिस्ड कॉल द्या.

अनेक शहरांमध्ये ऑडिशन्स पूर्ण झाल्या असून आता मुंबईमध्ये आपल्या अखेरच्या ऑन ग्राऊंड ऑडिशनचे आयोजन करण्यासाठी झी टीव्ही सज्ज आहे. जर तुम्हांला गायनाची आवड असेल आणि अख्ख्या जगासमोर आपली कला दाखवायची असेल तर आपल्या जवळच्या शहरात होत असलेल्या ऑडिशन्समध्ये सहभाग घ्या आणि ह्या भव्य रिॲलिटी शो चा हिस्सा बना.

सा रे ग म प चा प्रीमिअर लवकरच होणार आहे झी टीव्हीवर. ह्या अद्‌भुत प्रवासावर आमच्यासोबत या आणि उद्याच्या भावी सिताऱ्यांना समर्थन द्या.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..