'सूर-ताल विलेपार्ले(पूर्व)'ची एस डी व आर डी बर्मन अर्थात पंचमदांना संगीतमय आदरांजली!

खास गिरगांवकरांसोबत लोकाग्रहास्तव बर्मन पिता पुत्र ह्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांवर आधारित कराओके गाण्यांचा कार्यक्रम ! 

'सूर-ताल विलेपार्ले(पूर्व)'ची  एस डी व आर डी बर्मन अर्थात पंचमदांना संगीतमय आदरांजली!

शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ५.४५ ते ८.३० चित्तपावन ब्राह्मण संघ, गिरगांव येथे

मुंबईतील 'सूर-ताल'-विलेपार्ले(पूर्व) ही संस्था गेली अनेक वर्ष संगीत साधनेसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि नवोदित कलावंत यांच्यासाठी 'सुर ताल'चे व्यासपीठ कायम उपलब्ध आहे. गतवर्षी गानसम्राज्ञी 'भारतरत्न लता मंगेशकर' आणि 'संगीतकार बप्पी लाहिरी' यांना संगीतमय आदरांजली वाहणारी ‘सांज ये गोकुळी’ ही बहारदार सुरेल मैफिल 'सूर-ताल'ने आयोजित करून गिरगांवकरांची पसंती मिळविली होती. २२ जुन रोजी झालेल्या कार्यक्रमात खास एस डी आणि आरडींच्या गाण्यांची मैफिल परत एकदा आयोजित करण्याची विनंती 'सूर-ताल'च्या आयोजकांना गिरगावकरांकडून करण्यात आली होती. त्यानुसार म्युझिकल वर्ल्ड ऑफ बर्मन हा एस डी आणि आरडी बर्मन  ह्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्या अजरामर बहारदार लोकप्रिय गाण्यांचा गिरगावाकरांना आनंद घेता येणार आहे.

ह्या कार्यक्रमाला डॉक्टर जितेंद्र खेर ह्यांच्या माउंटन रेज ह्या कंपनी चे सह प्रायोजकत्व लाभले आहे.

या कार्यक्रमात एस डी आणि आर डी ह्यांची लोकप्रिय गाणी गायिका अमृता, संध्या व गायक यशवंत, रुदय, अमर आपल्या सुरेल आवाजात सादर करणार आहेत. आकाशवाणीच्या आरजे पद्मजा बापये या कार्यक्रमाचे रंजक आणि खुसखुशीत निवेदन करत बर्मन ह्यांचा संगीतमय जीवनप्रवास उलगडून सांगणार आहेत. शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०२४  रोजी संध्याकाळी ५.४५ ते ८.३० या वेळेत चित्तपावन ब्राह्मण संघ,

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..