कलर्स मराठी'वर गुरुपौर्णिमा महासोहळा
'कलर्स मराठी'चा वर गुरुपौर्णिमा महासोहळा !
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'आणि 'जय जय स्वामी समर्थ'चा मालिकांचा रंगणार विशेष भाग
'कलर्स मराठी वाहिनी'वरील सर्वच मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. यंदाची गुरुपौर्णिमा कलर्स मराठी वाहिनीवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने सादर होणार असून गुरुपौर्णिमेचा महासोहळा प्रेक्षकांना गुरुकृपेचा अलौकिक साक्षात्कार घडवणार आहे. 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' आणि 'जय जय स्वामी समर्थ' या दोन्ही लोकप्रिय मालिकांचे एक तासाचे रविवार विशेष भाग प्रेक्षकांना गुरुकृपेची अनोखी महती सांगणारे असणार असून बाळूमामा आणि स्वामी समर्थांनी गुरुभक्तीचा सांगितलेला खरा अर्थ या विशेष भागांमध्ये उलगडणार आहे. गुरुभक्तीच्या गोष्टीतून गुरुकृपेचा अनोखा अर्थ उलगडणार असल्याने स्वामी भक्तांसाठी हा भाग खूप विशेष असेल.
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेचा दु 1:00 वा आणि संध्या 7:00 वा विशेष भाग पार पडणार आहे.'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेचा दु 2:00 वा आणि रात्री 8:00 वा. विशेष भाग पार पडेल.
बाळूमामांची आणि भालचंद्र महाराजांची अनोखी भेट,मामांचे गुरु सदगुरू मुळे महाराज यांची मामांच्या हस्ते पाद्यपूजा हा अलौकिक भक्तीचा भाग अनुभवता येणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची आरती आणि दिव्य पाद्यपूजा यासोबतच स्वामी स्थानावरील एकनाथ (कानफाट्या) आणि नृसिंह सरस्वस्ती महाराजांचा शिष्य सायंदेव यांच्या गुरुभक्तीच्या गोष्टीतून गुरुकृपेचा अनोखा अर्थ उलगडणार आहे. यामुळे हा विशेष भाग स्वामी भक्तांसाठी खास असेल.
Comments
Post a Comment