ऑनरकडून भारतात ऑनर 200 सिरिज लाँच
ऑनरकडून भारतात ऑनर 200 सिरिज लाँच
एआय-पॉवर्ड स्टुडिओ-लेव्हल पोर्ट्रेट फोटोग्राफीद्वारे मोबाइल इमेजिंगला नव्याने परिभाषित करते
DXO मार्क गोल्ड-प्रमाणित 6.78-इंच आय कम्फर्ट डिस्प्ले, स्टुडिओ हार्कोर्टच्या सोबतीने निर्मित ऑनर एआय पोर्ट्रेट इंजिनसह प्रो-ग्रेड पोर्ट्रेट फोटोग्राफी आणि सेकंड-जनरेशन सिलिकॉन-कार्बन बॅटरीसह सुधारित परफॉर्मन्स
नवी दिल्ली, 25 जुलै 2024: HONOR ने त्याच्या पोर्टफोलिओचा भारतीय बाजारपेठेत विस्तार करत तिच्या प्रतिष्ठित नंबर सिरिजमध्ये नवीनतम भर म्हणून आज HONOR 200 सिरिज लॉंच करण्याची घोषणा केली. HONOR 200 Pro 5G आणि HONOR 200 5G चा समावेश असलेली ही नवीन सिरिज पॉवर आणि सर्जनशीलतेच्या मर्यादांना ओलंडते आणि अभूतपूर्व बदल घडवून आणणाऱ्या AI-पॉवर्ड पोर्ट्रेट क्षमता, इमर्सिव्ह डिस्प्ले, उत्तम हार्डवेअर परफॉर्मन्स आणि अंतर्ज्ञानी वापरकर्ता-केंद्रित एआय अनुभवांच्या बळावर ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव प्रदान करते.
HONOR 200 Pro 5G ओशन साईन आणि ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये आणि रु.57,999 च्या किमतीत उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची विक्री 20 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजता Amazon.in, ब्रँड वेबसाइट - explorehonor.com आणि तुमच्या जवळच्या मेनलाइन स्टोअर्सवर सुरू होईल. 20 आणि 23 जुलै दरम्यान सर्व ग्राहक हा स्मार्टफोन रु. 8000च्या इन्स्टंट डिस्काऊंट खरेदी करु शकतात. सोबतच, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय बँक क्रेडिट कार्ड धारक ग्राहक रु.3000चे अतिरिक्त डिस्काऊंट मिळवूही शकतात. याव्यतिरिक्त, ग्राहक काही निवडक मेनलाइन स्टोअर्समध्ये रु.8,499 किमतीच्या मोफत ऑनर भेटवस्तूंचा लाभ घेऊ शकतात किंवा त्याऐवजी रु.2000च्या इन्स्टंट कूपन सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
HONOR 200 5G हासुद्धा मूनलाईट व्हाईट आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन 12GB+512GB (किंमत रु.39,999) आणि 8GB+256 GB (किंमत 34,999) अशा दोन प्रकारांत उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची विक्री 20 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजता Amazon.in, ब्रँड वेबसाइट explorehonor.com आणि तुमच्या जवळच्या मेनलाइन स्टोअर्सवर सुरू होईल. 20 आणि 23 जुलै दरम्यान हा स्मार्टफोन रु.2000च्या बँक ऑफरसह रु.1000च्या इन्स्टंट डिस्काऊंटमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, ग्राहक काही निवडक मेनलाईन स्टोअर्समध्ये रु.8,499 किमतीच्या मोफत ऑनर गिफ्ट्सचाही लाभ घेऊ शकतात किंवा त्याऐवजी रु.2000चे इन्स्टंट कूपन मिळवू शकतात. या आकर्षक ऑफर्ससह HONOR 200 5G (8GB +256GB) व्हेरियंट 20 आणि 23 जुलै रोजी रु.29,999*पासून सुरू होणाऱ्या किमतीत खरेदी करता येईल.
विश्वासार्ह आणि टिकाऊ ब्रँड बनवण्याच्या बांधिलकीला अधिक मजबूत करत ऑनर त्याच्या ग्राहकांसाठी खालील सर्व्हिस ऑफर्स देखील प्रदान करत आहे -
· खरेदीच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत एक-वेळ ADLD
· इनव्हॉइसच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत जीएसटी वगळून 90%पर्यंत खात्रीशीर बायबॅक
· 6 महिने विस्तारित वॉरंटी
· 18 महिने घरपोच सर्व्हिस
· इंडस्ट्रीमध्ये प्रथमच 3 महिन्यांचे सायबर सुरक्षा कव्हर (50,000 पर्यंत)
एवढेच नाही, तर HONOR 200 सिरिज शून्य डाऊन पेमेंटवरही उपलब्ध असेल. तसेच NCEMIसारखे इतर परवडणारे पर्याय देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, ओरिजिनल 100W HONOR चार्जर्स Amazon.in, ब्रँड वेबसाइट - explorehonor.com आणि तुमच्या जवळपासच्या मेनलाइन स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असतील.
उत्कृष्ट परफॉर्मन्स, एआय क्षमता आणि आकर्षक डिझाईनची आवड असणाऱ्या वापरकर्त्यांची पहिली पसंत होण्यासाठी तयार असलेली HONOR 200 सिरिज तिच्या ट्रिपल-कॅमेरा सिस्टमसह फोटोग्राफीमध्ये उत्कृष्ट आहे: एक 50MP पोर्ट्रेट मुख्य कॅमेरा, 50MP पोर्ट्रेट टेलीफोटो कॅमेरा, 12MP अल्ट्रा -वाइड लेन्स आणि 50MP पोर्ट्रेट सेल्फी कॅमेरा. ही सिरिज स्टुडिओ हार्कोर्टच्या सहकार्याने विकसित केलेल्या AI-पॉवर्ड ऑनर एआय पोर्ट्रेट इंजिनच्या मदतीने पोर्ट्रेट फोटोग्राफीला उंचावत. हे तंत्रज्ञान स्टुडिओ लेव्हलच्या पोर्ट्रेटसाठी हार्कोर्टचे लाईट आणि शाडो टेक्निकला एकत्रित करते आणि आयडियल एक्सपोझर सेटिंग्जसाठी प्रकाश, स्कीन टोन, कलर टेंपरेचर आणि सिन कंपोझिशन तपासते.
दोन्ही डिव्हाइसेसमध्ये एआय-पॉवर्ड आय कम्फर्ट आणि अमोल्ड क्वाड कर्व्ह डिस्प्ले उपलब्ध आहे आणि ते ऑनरच्या MagicLM एआयसह MagicOS 8.0वर (अँन्ड्रॉईड 14) चालणारी ही सिरिज HONOR 200 Proमधील Snapdragon 8s Gen 3 आणि HONOR 200मधील Snapdragon 7 Gen 3 चिपसेटसह सीमलेस परफॉर्मन्स सुनिश्चित करते. HONOR 200 सिरिजमध्ये सेकंड जनरेशनची 5200mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरीदेखील उपलब्ध आहे, जी अपवादात्मक बॅटरी लाईफ आणि आव्हानात्मक परिस्थितीतही विश्वसनीय परफॉर्मन्स प्रदान करते.
उत्पादकता वाढवण्यासाठी HONOR 200 सिरिजमध्ये लाइटनिंग-फास्ट 100W वायर्ड ऑनर सुपरचार्ज फीचर उपलब्ध आहे, ज्यामुळे HONOR 200 Pro फक्त 41 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. प्रो व्हेरियंट 66W वायरलेस ऑनर सुपरचार्ज देखील ऑफर करतो आणि बॅटरी संपण्याची चिंता दूर करत सीमलेस ऑनलाइन गेमिंग आणि इमर्सिव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग सुनिश्चित करते.
या लॉंचबद्दल बोलताना HTechचे व्यवस्थापकीय सह-संचालक श्री. सी. पी. खंडेलवाल म्हणाले, “HONOR 200 सिरिजचे लॉंच करणे हा भारतातील स्मार्टफोन अनुभवाला पुन्हा परिभाषित करण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. HONOR 200 सिरिज तिच्या अत्याधुनिक AI-पॉवर्ड पोर्ट्रेट फोटोग्राफी, उत्कृष्ट डिस्प्ले टेक्नॉलॉजी आणि परफॉर्मन्स क्षमतांच्या मदतीने इंडस्ट्रीमध्ये नवीन बेंचमार्क निश्चित करण्यासाठी तयार आहे. आम्ही बाजारपेठेत अशी नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्स उपलब्ध करवण्यासाठी वचनबद्ध आहोत, जे आमच्या ग्राहकांच्या फक्त अपेक्षाच पूर्ण करत नाहीत, तर त्याही पलीकडे जाऊन त्यांना बरंच काही देतात. HONOR 200 सिरिज आमच्या ह्याच वचनबद्धतेचे उदाहरण देते. आम्ही हे अभूतपूर्व बदल घडवून आणणारे डिव्हाईसेस भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यास आणि आमच्या वापरकर्त्यांच्या जीवनावर पडणाऱ्या त्यांच्या सकारात्मक प्रभावाला जाणून घेण्यास आम्ही अतिशय उत्सुक आहोत."
Comments
Post a Comment