पुष्कर जोग घेऊन येतोय 'टॅबू'

पुष्कर जोग घेऊन येतोय 'टँबू'

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर समोर आलेला चेहरा म्हणजे पुष्कर जोग. आजवर पुष्करने आपल्या वैविध्यपूर्ण, नैसर्गिक अभिनयाची प्रेक्षकांवर छाप पाडली आहेच. याशिवाय नात्यांसारख्या संवेदनशील विषयांवरील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही त्याने केले आहे. इतकेच नाही तर त्याच्या प्रत्येक चित्रपटाची काही खासियत असते. प्रत्येक चित्रपटात त्याचा एक वेगळा प्रयत्न असतो. यंदाचे वर्ष तर पुष्करसाठी जास्तच खास आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने 'मुसाफिरा'सारखा भव्य चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला. स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर येथे या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या ठिकाणी चित्रीकरण करणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. तर 'कोक' या आगामी बॉलिवूड चित्रपटात पुष्कर लीड रोलमध्ये झळकणार असून लवकरच त्याचा ' 'धर्मा- दि एआय स्टोरी' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी  चित्रपट आहे.  यात अभिनयासह दिग्दर्शनाची जबाबदारीही पुष्करने सांभाळली आहे. एका पाठोपाठ हे प्रोजेक्ट्स असतानाच आता पुष्करने एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. 'टॅबू' असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, गुझबम्प्स एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेख जोग करणार असून योगेश महादेव कोळी या चित्रपटाचे डीओपी आहेत. 'टॅबू'ची खासियत म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रित होणार हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. दरम्यान, या चित्रपटात कोणते चेहरे झळकणार हे जाणून घेण्यासाठी थोडी पाहावी लागेल.  

आपल्या नवीन प्रोजेक्टबद्दल पुष्कर जोग म्हणतो, '' एक कलाकार म्हणून माझ्याकडून जे सर्वोत्कृष्ट देता येईल, ते देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. रिऍलिस्टिक चित्रपट हे प्रेक्षकांना जास्त जवळचे वाटतात. त्यामुळे मी नेहमीच नातेसंबंधांवर चित्रपट बनवतो. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. काही नवनवीन देण्याचा माझा कायमच प्रयोग करतो.  'टॅबू'च्या माध्यमातूनही मी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. नुकतीच चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. लवकरच चित्रपटही भेटीला येईल.''

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight