लीलाच्या हाती लागेल का अंतराच्या मृत्यू मागचं सत्य ?
लीलाच्या हाती लागेल का अंतराच्या मृत्यू मागचं सत्य ?
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत लीला आणि एजे पाचपरतावणीसाठी लीलाच्या माहेरी गेले असताना एजेला एक रात्र तिथे राहावं लागतं. एजेला काही गोष्टींचा त्रास होतोय पण काही गोष्टी त्याला नव्याने कळतात. लीलाच्या आई बाबांसमोर एजे आणि लीला सुखी जोडपं असल्यासारखे वावरतायंत. एजे असं वागत आहेत हे पाहुन लीलाला खूप बरं वाटतं. पण किशोर तिला सतत आठवण करून देत आहे की तुला अंतराच्या मृत्यूचे पुरावे शोधायचे आहेत. त्यामुळे ती एजे कडे सतत साशंक नजरेने पाहत आहे. एजे लीला घरी परत आल्यावर लीला अंतराचं कपाट उघडायला जाते आणि एजे ते पाहतो. अंतराच्या कोणत्याही गोष्टीला हात लावलेला त्याला आवडत नाही आणि तिथे या चुकीबद्दल एजे लीलाला शिक्षा करतो. *काय असेल आहे अंतराच्या मृत्यूमागचं रहस्य ? लीला घेऊ शकेल का सत्याचा शोध ? एजे आणि लीलाच्या नात्यामध्ये फुलेल का प्रेमाची कळी?...जाणून घेण्यासाठी पहायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
Comments
Post a Comment