पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत मिथिला आणि कुंटूंबासाठी नवीन उमेद घेऊन येणार सौमित्र...
पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत मिथिला आणि कुंटूंबासाठी नवीन उमेद घेऊन येणार सौमित्र...
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुख कळले' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. काही दिवसांपासून मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट येत आहेत. माधवच्या आकस्मिक निधनानंतर मिथिलाने कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचा डोलारा स्वत:च्या खांद्यावर घेतला आहे. तब्बल 10 वर्षांनी ऑफिसमध्ये पाऊल ठेवणारी मिथिला उत्तम गृहिणी असताना तिचे टाइम आणि रिसोर्स मॅनेजमेंट स्किल वापरुन नोकरीतही उजवी ठरतेय. धावत्या जगासोबत जगण्याच्या तिच्या प्रयत्नांना कधी आणि कसं यश मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यात मालिकेत काही दिवसांपूर्वीच सौमित्रची एन्ट्री झाली आहे. सौमित्रच्या एन्ट्रीमुळे कथा आणखी रंगतदार झाली आहे. जणू पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत मिथिला आणि कुटुंबासाठी एक नवी उमेद घेऊन आलाय सौमित्र.
'सुख कळले' मालिकेच्या आगामी भागात दु:खातून सावरणारी मिथिला पहिल्यांदाच मनसोक्त पावसाचा आनंद घेताना दिसणार आहे. आजवर मनाने खंबीर असणारी मिथिला आपण सगळ्यांनीच पाहिली. पण येत्या आठवड्यात मिथिला, अगदी तिचं बालपण परतल्यासारखं, पावसात भिजताना दिसणार आहे. मिथिलामध्ये हा बदल नक्की कशामुळे घडला हे जाणून घेण्याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रत्येक भागात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
पावसाच्या आगमनासोबत मिथिलाने एक मोठा निर्णय घेतला आहे की प्रत्येक दिवस माधवसारखा जगायचा, अगदी आनंदात पण या निर्णयामागे नक्की काय कारण आहे, मालिकेत आणखी काय सरप्राईज बघायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक एपिसोड नक्की पाहा.'सुख कळले' सोम-शुक्र, रात्री 9 वा. फक्त 'कलर्स मराठी'वर आणि कधीही Jio Cinema वर.
Comments
Post a Comment