'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' गोष्ट… 'घरत गणपती'

'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाचीगोष्ट 'घरत गणपती'

कोकणी माणसाचं आणि गणेशोत्सवाचं अजोड नातं आहे. गणपती’ असा शब्दोच्चार जरी झाला तरी एक वेगळीच लहर कोकणी माणसाच्या मनाला स्पर्शून जाते. कोकणी माणसाला गणपतीत गावची ओढ लागण्याचं आणखी एक कारण कोकणवासी खरोखरच गोतावळा प्रिय असतो. नातेसंबंध जपण्यासाठीपाहुणचारासाठी त्याची विशिष्ट अशी ओळख आहे. या सणाच्या निमित्ताने  नात्यांचे  बंध जपत  उत्सवाचा आनंद  द्विगुणीत करण्यासाठी याहून अनोखी संधी असूच शकत नाही.  याच गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन 'घरत गणपती' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने घरत गणपती हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठकअभिषेक पाठकनम्रता बांदिवडेकरनवज्योत नरेंद्र बांदिवडेकरगौरी कालेलकर-चौधरी यांनी घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाचीही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. निकिता दत्ताभूषण प्रधानअश्विनी भावेअजिंक्य देव,संजय मोनेशुभांगी लाटकरशुभांगी गोखलेडॉ.शरद भुताडियासुषमा देशपांडेपरी तेलंग,आशिष पाथोडेरूपेश बनेराजसी भावेसमीर खांडेकरदिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत. नातेसंबंधातील  प्रेमगोडवा सणांच्या माध्यमातून निश्चितच निर्माण होत असतो. हाच धागा घेऊन सर्वांगसुंदर अशी लंबोदर’ कथा 'घरत गणपती' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. कोकणातल्या एका सुखवस्तू कुटुंबातील ही गोष्ट आहे. घरातील गणपतीच्या निमित्ताने घरत कुटुंबात घडणाऱ्या सहज-साध्या गोष्टीज्यात गमतीजमती आहेतराग-लोभ आहेतएकमेकांविषयी वाटणारी माया आहे.

चित्रपटाला साजेशी चार गाणी चित्रपटात असून 'माझा कोकण भारीआणि 'नवसाची  गौराई  माझीया गाण्यांना सोशल माध्यमावर उत्तम प्रतिसाद मिळतोय. श्रद्धा दळवीसमीर सामंत,अलोक सुतार यांनी लिहिलेल्या गीतांना जावेद अलीविशाल ददलानीअभय जोधपूरकरसायली खरे, ‘द कोकण कलेक्टिव्ह’ गर्ल्स यांनी स्वरबद्ध केलं आहे 

घरत गणपती हा कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल असा विश्वास पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर उत्तम कथानक व भव्यदिव्यता दिसेल असा विश्वास व्यक्त करताना नात्यांचा हा प्रवास प्रत्येकाला समृद्ध करेलअसं दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी सांगितलं.  

पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने घरत गणपती.  नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

घरत गणपती हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight