एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 मध्ये मानसिक आरोग्य कृतीची समाजाला नितांत गरज असल्याची बाब नीरजा बिर्ला..

युवा वर्गाच्या मानसिक आरोग्य सुधारणांकरिता नीरजा बिर्ला यांचा पुढाकार, एमपॉवरिंगमाइंड्स समिट 2025 मध्ये ट्रान्सफॉर्मेटिव्ह कन्सोर्मेटिव्ह कन्सोर्टियमचा शुभारंभ

( एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025मध्ये एमपॉवरिंग अहवालाचे अनावरण (डावीकडून उजवीकडे): डॉ. झिरक मार्कर,मपॉवरिंगचे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ आणि सल्लागार; श्रीमती नीरजा बिर्ला, एमपॉवरिंग आणि ABET च्या संस्थापक आणि अध्यक्षा; आणि डॉ. विजय बाविस्कर, मानसिक आरोग्य सेवा संचालक, महाराष्ट्र सरकार)

माननीय नीरजा बिर्ला यांच्या हस्ते एमपॉवर रिसर्च रिपोर्टचे अनावरण;तरुणांच्या मानसिक कल्याण चळवळीचा आढावा 

मुंबई, 26 फेब्रुवारी, 2025: “आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट (एबीईटी) अंतर्गत  एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 या उपक्रमात हार्वर्ड मेडिकल स्कूल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, मेंटल हेल्थ फर्स्ट एड (एमएचएफए) ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, शिक्षक, धोरणकर्ते यांची तरुणांमधील वाढत्या मानसिक आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी बैठक घेण्यात आली. ज्या देशाचे आर्थिक भविष्य त्याच्या युवकांच्या कल्याणाशी जोडलेले आहे अशा आपल्या भारतात आता सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध क्षेत्रांच्या हस्तक्षेपाची तातडीची गरज या शिखर परिषदेने अधोरेखित केली.”

आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिक आणि अध्यक्षा नीरजा बिर्ला यांनी 'अनवेलिंग द सायलंट स्ट्रगल: एमपॉवर रिसर्च रिपोर्टचे अनावरण केले. देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील एकटेपणा, निद्रानाश आणि तणाव यांचा तरुणांचे मानसिक आरोग्य आणि कल्याणाशी संबंध असतो यावर रिपोर्टमध्ये भर देण्यात आला. महाराष्ट्र सरकारचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आरोग्य सचिव निपुण विनायक आणि मेंटल हेल्थ सर्व्हिसेसचे संचालक डॉ. भाविस्कर उपस्थित होते. या रिपोर्टमध्ये तरुणांमधील वाढत्या मानसिक आरोग्याच्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला. ज्यात 50% परिस्थिती वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत उद्भवतात आणि त्यावर झटपट निदान होत नाही किंवा प्रयत्न अपुरा पडतो. मुख्य निष्कर्षांत आढळून आलेले मुद्दे: 38% विद्यार्थ्यांना शैक्षणिक चिंतेचा सामना करावा लागतो, 50% घसरलेली कामगिरी, 41% सामाजिक अलगीकरण अनुभवतात आणि 47% झोपेच्या समस्यांशी संघर्ष करतात. समस्यांचा विपरित परिणाम विद्यार्थिनींवरही होतो. जवळपास 9% लोकांना गंभीर झोपेच्या समस्येचा सामना करावा लागतो, तर 8.7% लोकांनी शैक्षणिक दबावामुळे आत्महत्या करण्याचा विचार केला आहे. त्यापैकी केवळ 2% लोक व्यावसायिक मदत घेतात. या अभ्यासात एकाकीपणा आणि झोपेतील व्यत्यय (35% परस्परसंबंध) आणि तणाव (47% परस्परसंबंध) यांच्यातील एक मजबूत दुवा देखील दिसून आला. जो पद्धतशीर मानसिक आरोग्य सुधारणांच्या तातडीच्या गरजेवर जोर देतो.

एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकत, नीरजा बिर्ला यांनी ग्लोबल मेंटल हेल्थ कन्सोर्टियम सुरू करण्याची घोषणा केली. या माध्यमातून भारत तसेच भारताबाहेर मानसिक आरोग्य क्षेत्रात पद्धतशीर बदल (सिस्टीमॅटीक चेंज) घडवून आणण्याच्या दृष्टीकोनातून एक सहयोगी उपक्रम राबविला जाणार आहे. धोरणात्मक परिवर्तन, प्रारंभिक अवस्थेत हस्तक्षेप मॉडेल आणि आंतर-क्षेत्र क्षमता बांधणीवर लक्ष केंद्रित करून, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक विकासाचा आवश्यक आधारस्तंभ म्हणून मानसिक आरोग्याला प्राधान्य  सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

तातडीने कृती करण्याच्या गरजेवर, नीरजा बिर्ला म्हणाल्या, “भारताच्या प्रगतीला चालना देणाऱ्या लवचीक, उत्पादनक्षम आणि आनंदी युवकांची जोपासना करणे हा 'समृद्ध भारत 2047' साठीचा आमचा दृष्टिकोन आहे. युवकांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आणि दीर्घकालीन परिणाम निर्माण करण्यासाठी तज्ज्ञांना एकत्र आणून धोरणांना आकार देण्यासाठी, निधी वाढविण्यासाठी, क्षमता बांधणी बळकट करण्यासाठी आणि शाश्वत मानसिक आरोग्य चौकट स्थापित करण्यासाठी स्वीकृती, कृती आणि वकिलीला प्रोत्साहन देऊन या दृष्टीकोनाचे कृतीमध्ये रूपांतर करण्यासाठी एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. बदलासाठी उत्प्रेरक म्हणून, या शिखर परिषदेने 'अनवेलिंग द सायलेंट स्ट्रगल "या आमच्या संशोधन अहवालाचे अनावरण करण्यासाठी मंच म्हणूनही काम केले. ज्यामध्ये तरुणांमधील मानसिक आरोग्याच्या आव्हानांचा सामना करण्याची, लवकर हस्तक्षेप करण्याची, परिणामांमध्ये सुधारणा करण्याची आणि सामूहिक जबाबदारी म्हणून आत्महत्येचे प्रमाण कमी करण्याची तातडीची गरज अधोरेखित होते. जागतिक मानसिक आरोग्य संघटनेची स्थापना या वचनबद्धतेला आणखी बळकटी देते आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात दीर्घकालीन परिणाम सुनिश्चित करते.”

तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज: झटपट हस्तक्षेपाचे आवाहन 

डॉ. शेखर शेषाद्री, माजी प्रोफेसर, NIMHANS

“तज्ज्ञांना एकत्र आणणे तसेच तरुणांच्या मानसिक आरोग्यासाठी कृती करण्यासाठी हा मंच तयार केल्याबद्दल श्रीमती नीरजा बिर्ला यांचे आभार मानतो. आजच्या तरुणांना अशा आव्हानांचा सामना करावा लागतो; ज्यात शिक्षक, पालक आणि धोरणकर्त्यांच्या लवकर हस्तक्षेपाची आवश्यकता असते. प्रतिसाद प्रणाली बळकट करणे आणि सहकार्य वाढवणे गंभीर संकटे रोखू शकते आणि प्रत्येक तरुण व्यक्तीला पाठिंबा मिळेल याची खात्री करू शकते.”

डॉ. ब्लेझ् अग्युरे, फाउंडिंग मेडिकल डायरेक्टर, मॅकलीन हॉस्पिटल, हार्वर्ड मेडिकल स्कूल

“किशोर वयातील मानसिक आरोग्य हे एक जागतिक संकट आहे. भारताच्या विशाल युवा लोकसंख्येतील वाढत्या चिंतांमुळे कलंक आणि प्रणालीगत अंतर यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. श्रीमती नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील एमपॉवरिंग माइंड्स समिट ही शोकांतिका रोखण्यासाठी वेळेवर सहाय्य सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आता कृती करण्याची वेळ आली आहे.”

डॉ. श्याम बिशेन, प्रमुख, आरोग्य आणि आरोग्यसेवा केंद्र, वर्ल्ड इकनॉमिक फोरम 

“मानसिक आरोग्य हे आरोग्यसेवेच्या पलीकडे आहे. हा मूलभूत मानवी हक्क असून सामाजिक आणि आर्थिक कल्याणाचा पाया आहे. जागतिक आर्थिक मंचावर, आम्ही जागतिक बहु-हितधारक भागीदारीद्वारे सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक धोरणात मानसिक आरोग्याचे बीज पेरण्याच्या परिवर्तनात्मक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देतो. मुले आणि तरुणांना घडवण्यापासून ते कार्यालयीन ठिकाणी कल्याणाचे नेतृत्व करण्यापर्यंत, मानसिक आरोग्य हा समाजाच्या प्रत्येक स्तरावरील पाया असला पाहिजे.”

मानसिक आरोग्य शिखर परिषद युवकांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष वेधण्यासाठी शैक्षणिक नेते, वैद्यकीय व्यावसायिक, आरोग्य तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि सामाजिक प्रभाव समर्थक (सोशल इम्पॅक्ट अँडव्होकेट्स) यांना एकत्र आणते. हे वैविध्यपूर्ण मिश्रण शिक्षण, धोरण, क्लिनिकल प्रॅक्टिस, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष अनुभवांमध्ये सहकार्य वाढवते. अर्थपूर्ण उपाय त्याचप्रमाणे क्रॉस-फंक्शनल लर्निंगसाठी एक मंच तयार करते.

Comments

Popular posts from this blog

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..