प्राजक्ताचा वेगळा अंदाज

 प्राजक्ताचा वेगळा अंदाज

अभिनयनृत्य व निर्माती अशा विविध भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न प्राजक्ता नेहमीच करत आली आहे. आगामी चिकी चिकी बुबूम बुम या चित्रपटात ती  रावी या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. रावी ही अतिशय चुलबुली आणि उत्साही आहे  पण त्याचवेळी ती  गोंधळलेली सुद्धा आहे. विनोदाचा वेगळा बाज असलेली ही चॅलेंजिंग भूमिका प्राजक्ता साकारत आहे. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे 'चिकी चिकी बुबूम बुम हा चित्रपट. धमालमस्तीहास्याचे स्फोट उडवत २८ फेब्रुवारीला 'चिकी चिकी बुबूम बुम प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार आहे. 

कसलेल्या विनोदी कलाकारांसोबत काम करण्याची संधी हे माझ्यासाठी खूप खास होतं. माझ्या आजवरच्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून 'चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटातील माझ्या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील’ असा विश्वास प्राजक्ता व्यक्त करते 

प्राजक्ता माळी सोबत स्वप्नील जोशीप्रार्थना बेहरेप्रसाद महादेव खांडेकररोहित मानेप्रथमेश शिवलकरनम्रता संभेराववनिता खरातसचिन गोस्वामीओंकार राऊतप्रियदर्शनी इंदलकरअभिजीत चव्हाणनिखिल रत्नपारखीप्रभाकर मोरेचेतना भटनिखिल बनेश्याम राजपूतऐश्वर्या बडदेश्लोक खांडेकरप्रमोद बनसोडे या कलाकारांची  फौज चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटात  हास्याचे फवारे उडवत रंगत आणणार आहेत.

नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मितआयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकरप्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025