शिवशाही’च्या रूपात गोवा ऐतिहासिक नाट्यकृतीचा साक्षीदार

'शिवशाही’च्या रूपात गोवा ऐतिहासिक नाट्यकृतीचा साक्षीदार

 २५ फेब्रुवारी २०२५ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि वारशाचा गौरव सांगणाऱ्या 'शिव शाही' या भव्य आणि नेत्रदीपक नाट्य निर्मितीचा गोवा साक्षीदार झाला. या नाट्य प्रयोगातून गोव्याचा अतुलनीय असा सांस्कृतिक ठेवा दिसून आला. पर्वरीमध्ये आयोजित केलेल्या या ऐतिहासिक नाट्य प्रयोगाने प्रेक्षकांना १७व्या शतकात परत नेले व भारताच्या महान योद्धांपैकी एक शिवरायांचे धैर्य, दूरदृष्टी आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविले.

पर्वरी येथील हाऊसिंग बोर्ड मैदानावर नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांचा समुद्र दिसून आला, हजारो लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कौतुक आणि आदर व्यक्त केला. या भव्य देखाव्याचे साक्षीदार होण्यासाठी झालेली मोठ्या प्रमाणात गर्दी ही, आजही शिवाजी महाराजांच्या आज्ञेचा पुरावा देत होती. लोक खांद्याला खांदा लावून उभे राहुन, जयजयकार करून, टाळ्या वाजवून आयुष्यात एकदा अनुभवल्या जाणाऱ्या या नाट्य अनुभवात मग्न झाले होते. असामान्य उर्जा, गर्जना आणि हवेतील भावनिक अनुनाद यांनी स्पष्ट केले, कि 'शिवशाही' हे केवळ नाटक नसून गोव्यात खरे चैतन्य जागृत करणारी ही चळवळ आहे.

महेंद्र महाडिक यांनी लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित 'शिवशाही' या नाटकाने गोव्यातील प्रेक्षकांना अप्रतिम कामगिरी, एक मोठा फिरता रंगमंच आणि शिवाजी महाराजांच्या पौराणिक लढाया आणि विजयांचे वर्णन करून मंत्रमुग्ध केले. १५० हून अधिक कलाकार, वास्तविक घोडे, बैलगाड्या, सोन्याचा नांगर आणि कोंकणी नावाचे चित्तथरारक १८ फुटांचे जहाज असलेल्या या नाटकाने  तीव्रतेने इतिहास जिवंत केला. घुमणारा टॉवर आणि भवानी देवीची १२ फूट उंच मूर्ती असलेल्या या पाच मजली रंगमंचाने शौर्य आणि रणनीतीच्या विस्मयकारक कथेची एक शक्तिशाली पार्श्वभूमी सांगितली. 

सादरीकरणातील सर्वात आकर्षक क्षणांपैकी एक म्हणजे, शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यातील नाट्यमय सामना. हे एक दृश्य असे होते ज्याने प्रेक्षकांना अचंबित केले. मराठा योद्धाची कल्पित दूरदृष्टी आणि अतुलनीय लढाईचे डावपेच पाहून प्रेक्षक भारावून गेले. 

गोव्यात ‘शिवशाही’ आणण्याला खूप मोठे महत्त्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्याशी असलेले ऐतिहासिक संबंध, त्यांनी आदिल शाहांवर मिळविलेला विजय आणि सांस्कृतिकव धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची त्यांची अतूट बांधिलकी, गोव्याच्या भावनेशी खोलवर जोडली गेली आहे. गोव्यातच शिवाजी महाराजांचे पहिले लिखित वृत्तांत उदयास आले, कारण पोर्तुगीज प्रवासी कॉस्मे दे गार्डा याने गोमंतकीयांचे मराठा शासकाप्रती असलेल्या कौतुकाचे दस्तऐवजीकरण केले.

पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली पर्यटन खात्याने हा भव्य देखावा गोव्यात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि सांस्कृतिक पर्यटनाचे जतन व  संवर्धन करण्यासाठी राज्याची बांधिलकी अधिक बळकट केली. ‘शिवशाही’च्या यशाबद्दल बोलताना, माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे यांनी टिपणी केली, कि "छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ही पिढ्यानपिढ्या पोचणारी मार्गदर्शक अशी शक्ती आहे. गोव्याचा मराठा साम्राज्याशी सखोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहे.  इतिहासाचे असे गौरवशाली अध्याय जिवंत केले जातील याची खात्री करणे ही आपली जबाबदारी आहे. ‘शिवशाही’द्वारे आम्ही केवळ महाराजांचे शौर्यच साजरे केले नाही तर भारताच्या भव्य ऐतिहासिक कथनात, गोव्याच्या भूमिकेला बळ दिले आहे. हे केवळ एका  नाटकापेक्षा जास्त आहे - ही एक चळवळ आहे, जी गोमंतकीयांमध्ये अभिमान आणि चेतना जागृत करते."

माननीय राज्यसभा खासदार श्री सदानंद शेट तानावडे यांनी या नाटकाचे कौतुक करताना सांगितले, की "शिवाजी महाराजांचे स्वराज्य, शौर्य आणि न्यायाचे आदर्श कालातीत आहेत. ‘शिवशाही’ ही एक भव्य आदरांजली आहे. गोव्याने या ऐतिहासिक निर्मितीला इतक्या उत्साहाने स्वीकारताना पाहणे हे देखील खरोखरच मनाला आनंद देणारे आहे.

खात्याच्या बांधिलकीवर भर देताना, पर्यटन संचालक श्री केदार नाईक म्हणाले, कि "शिवशाही सारख्या कार्यक्रमांद्वारे गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी, पर्यटन खाते कटिबद्ध आहे. या निर्मितीने राज्यातील ऐतिहासिक कथाकथनाचा एक मानक स्थापित केला आहे. आम्ही यासारख्या  आणखी भव्य उपक्रमांची अपेक्षा करतो."

अशाच प्रकारच्या भावना व्यक्त करताना, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री कुलदीप आरोलकर पुढे म्हणाले, कि "शिवाजी महाराजांचे गोव्याशी असलेले संबंध निर्विवाद आहेत. ‘शिवशाही’ने हा वारसा यशस्वीपणे पुनरुज्जीवित केला आहे. श्रोत्यांकडून मिळालेला जबरदस्त प्रतिसाद हे सिद्ध करते की इतिहास, उत्कटतेने सांगितला असता, तो प्रेरणा देत राहतो .

खचाखच भरलेले प्रेक्षक, उभे राहून केलेला जयघोष आणि उत्साहवर्धक वातावरणाने, गोव्यात शिवशाहीला ऐतिहासिक यश मिळाल्याचा दाखला दिला. याने खोलवर रुजलेल्या इतिहासाला साजरे करण्याच्या, राज्याच्या समर्पणाची पुष्टी केली. पर्यटन खाते जतन, शिक्षण आणि प्रेरणा देणारे असे सांस्कृतिक उपक्रम पुढे आणण्याच्या आपल्या ध्येयाकडे वचनबद्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..