प्रसाद खांडेकर आणि श्लोक खांडेकर ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात एकत्र

 बाप-लेकाची जोडी करणार धमाल

प्रसाद खांडेकर आणि श्लोक खांडेकर चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटात एकत्र 

वडील-मुलाचे समीकरण हे नेहमीच मित्रत्वाचे असते. लहानपणापासून प्रत्येक मुलासाठी वडील आदर्श असतातहिरो असतात. वडिलांसारखंच कर्तृत्ववान होण्याची त्यांची इच्छा असते. चित्रपटसृष्टीत बाप-लेक एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश होणार आहे. अभिनेता प्रसाद महादेव खांडेकर आणि त्यांचा मुलगा श्लोक खांडेकर आगामी चिकी चिकी बुबूम बुम या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहेवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्लोक खांडेकर अभिनयाचा श्रीगणेशा करणार आहे.  

आठ वर्षांचा इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या श्लोकने अभिनयाच्या आवडीतून या चित्रपटातील जॉनी लिव्हर पाध्ये ही भूमिका साकारली आहे. त्याची मजेशीर व्यक्तिरेखा काय धमाल उडवणारहे चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटात पाहणं रंजक असणार आहे. गारठणाऱ्या थंडीत स्विमिंगपूलमध्ये शूट ते स्केटिंग वरचा सीन या सगळ्या गोष्टी श्लोकाने अतिशय सफाईदारपणे केल्याने लेकाचा अभिमान तर आहेचपण या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हांला एकत्र प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं प्रसाद खांडेकर सांगतात.

नुकताच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे 'चिकी चिकी बुबूम बुम हा चित्रपट. नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मितआयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकरप्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे.

धमालमस्तीहास्याचे स्फोट उडवत २८ फेब्रुवारीला 'चिकी चिकी बुबूम बुम प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार आहे.  

Link :  https://youtu.be/jH7gEkvKfjQ?feature=shared

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

The International Temples Convention & Expo (ITCX) 2025