‘कणकाधीश’ चित्रपटाची घोषणा

 कणकाधीश चित्रपटाची घोषणा

कणकवलीच्या सद‌्‌गुरू भालचंद्र महाराजांची गाथा मराठी रुपेरी पडदयावर


गरजवंतांचे तारणहार होत दैवी अनुभूती देण्याचं काम अनेक महान अध्यात्मिक गुरूंनी आजवर केलं आहे. ज्यांनी आपल्या जीवनात आयुष्यभर तपसाधनेत मग्न राहून तपचर्या केली आणि भक्तांची दुःखे निवारण केले असे सद‌्‌गुरू भालचंद्र महाराज ही देवत्व प्राप्त केलेली महान अनुभूती. त्यांच्या कृपेची प्रचिती आजही असंख्य भाविकांना येते. योगियांचे योगीअसंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. कणकवली मध्ये नुकत्याच भालचंद्र महाराज यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्तनिर्माते हरेश शशिकांत आईर आणि  सौ.अमृता हरेश आईर  यांनी कणकाधीश या मराठी चित्रपटाची घोषणा करत चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले. महाराजांनी केलेल्या अलौकिक कार्याचा पट कणकाधीश या चित्रपटातून उलगडणार आहे. 

योगतपस्वीकणकाधिपती परमहंस भालचंद्र महाराजांची महती, अध्यात्मिक सामर्थ्याची प्रचीतीमहाराजांच्या जीवनचरित्रातील अनुभवांचे भावस्पर्शी सादरीकरण प्रत्येकाला महाराजांच्या सान्निध्याची नक्कीच अनुभूती देईल असा विश्वास मृद्रा व्हिज्युअल प्रोडक्शन्सचे  संस्थापक आणि कणकाधीश  चित्रपटाचे निर्माते हरेश शशिकांत आईर यांनी व्यक्त केला. 

मृद्रा व्हिज्युअल प्रोडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या कणकाधीश चित्रपटाचे लेखन प्रल्हाद कुडतरकर यांचे तर दिग्दर्शन विविध कोरगांवकर करणार आहेत. छायाचित्रण कौशल गोस्वामीसंगीत दिग्दर्शन साई-पीयुष यांचे आहे. कलादिग्दर्शन  महेश कुडाळकर यांचे आहे.  सहनिर्माते  मिलिंद शिंगटे आहेत.  या चित्रपटासाठी  छत्रपती  स्टुडिओ  यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Comments

Popular posts from this blog

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..