निजात का तालिब ग़ालिब
'निजात का तालिब ग़ालिब' हा कार्यक्रम १८ व्या शतकातील महान उर्दू कवी आणि तत्त्वज्ञ मिर्झा ग़ालिब यांच्या जीवनावर आणि साहित्यावर संगीतमय प्रकाश टाकतो..
हा कार्यक्रम त्यांच्या साहित्याचा, जीवनाचा, वेदनेचा आणि काळाचा अनुभव घेण्याचा एक प्रयत्न आहे. मिर्झा ग़ालिब यांच्या सामाजिक, वैयक्तिक, ऐतिहासिक आणि भावनिक पैलूंना स्पर्श करणारी ही एक संगीतमय यात्रा समीर सामंत आणि गायत्री सप्रे ढवळे हे निनाद सोलापूरकर, रोहित कुलकर्णी आणि अरुण गवई यांच्या साथसंगतीने सादर करणार आहेत. सर्वांसाठी हा कार्य्रक्रम विनामूल्य असून ग़ालिब यांचा काळ, त्यांची कविता, त्यांची व्यथा आणि तत्त्वज्ञान अनुभवण्याची ही एक अनोखी संधी आहे… नक्की या! असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
📅 तारीख: १५ जून २०२५
🕕 वेळ: संध्या. ६.०० वाजता
📍 स्थळ: गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, सदाशिव पेठ, पुणे
🎟️ प्रवेश: विनामूल्य
कार्यक्रमात सहभागी कलाकार :
🎤 समीर सामंत
🎤 गायत्री सप्रे ढवळे
🎹 निनाद सोलापूरकर
🎶 रोहित कुलकर्णी
🥁 अरुण गवई
Comments
Post a Comment