हैद्राबाद येथे कृषी-संशोधन केंद्राचा स्थापनेकरिता JFarm आणि ICRISAT टॅफ़ेचे भागीदार
हैद्राबाद येथे कृषी-संशोधन केंद्राचा स्थापनेकरिता JFarm आणि ICRISAT टॅफ़ेचे भागीदार
मुंबई : ट्रॅक्टर्स ॲन्ड फ़ार्म इक्विप्मेंट लिमिटेड (टॅफ़े), जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादनकर्त्यांपैकी एक तसेच भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या कंपनीने इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्युट फ़ॉर सेमी-ॲरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) सह मेमोरॅन्डम ऑफ़ अन्डर्स्टॅन्डिंग (MoU) वर स्वाक्षऱ्या केल्या ज्यामुळे “जेफ़ार्म अडॅप्टिव ॲग्रीकल्चर रिसर्च ॲन्ड एक्स्टेन्शन सेंटर” ची सुरवात ही ICRISAT चा पंतचेरू, हैद्राबाद येथील आवारात ११ जुलै २०२५ रोजी करण्यात आली.
टॅफ़ेने जेफ़ार्मची सुरुवात १९६४ मध्ये एका सीएसआर उपक्रमांतर्गत केली , यामुळे शेतकऱ्यांना संशोधनावर आधारीत उपाय योजना आणि प्रशिक्षण दिले जाणार होते. आपला विस्तार भवानीमंडी (२०१६) येथे सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत करत, जेफ़ार्मने “जेफ़ार्म ॲन्ड प्रोडक्ट ट्रेनिंग सेंटर” ची सुरवात पीजेटीएसएयुसह, तेलंगाना(२०१९) मध्ये केली आणि “जेफ़ार्म ॲन्ड मेकनायझेशन सेंटर” ची सुरवात व्हीएनएमकेव्ही, महाराष्ट्र (२०२३) मध्ये केली. हा जागतिक दृष्टीकोन घेऊन टॅफ़ेने आता ICRISAT सह एकत्र येत सेंटर ऑफ़ एक्सलन्स फ़ॉर साऊथ-साऊथ कोऑपरेशन इन ॲग्रीकल्चर (ISSCA) चा माध्यमाने पुढे न्यायचे ठरविले आहे, ज्यामुळे कल्पकतेची देवाण घेवाण आणि शेतीय विकास हा संपूर्ण जगातील दक्षिणेस करता येऊ शकेल.
जेफ़ार्म ॲडॅप्टिव रिसर्च सेंटर, हैद्राबाद येथे ICRISAT चा अभूतपूर्व कल्पकतेवर आधारीत मशीनचा मदतीने उत्पन्न करावयाचा हरभऱ्यासारख्या उपक्रमांना टॅफ़ेचा कृषी-यांत्रिकीकरणातील अनुभवाचा फ़ायदा करून दिला जाईल ज्यामुळे विविध पर्यावरांणांमध्ये आणि पिकांमध्ये संशोधनाची वैधता सिद्ध करता येऊ शकेल, तसेच लिंग आणि समाजातील सामायिकतेमुळे ते बक्षीसास देखील पात्र ठरेल. ही भागीदारी भारताचा शेतीमध्ये होणाऱ्या टिकाऊ, संपूर्णपणे यंत्रांवर आधारीत आणि आधुनिकतेचा बदलांना जलदगतीने आत्मसाद करण्यास बांधिल असेल आणि ही आधुनिकता संपूर्ण जागतिक दक्षिणेस नेण्याचा प्रयत्न देखील केला जाईल.
या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना टिकाऊ शेतीय उपाययोजना, मातीचे संवर्धन आणि पाण्याचा परिणामकारक वापर याबद्दल चे शिक्षण सुयोग्य अशा रचनात्मक पद्धतीने दिले जाणार आहे. यामुळे शेतीचा अनुसार योग्य त्या यंत्रणेचा वापर कसा करावा, तसेच पिकाचा-अवशेषांवरती प्रक्रिया करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना कृषी सेवा मॉडेल्स आणि उद्योजकतेबद्दल प्रोत्साहित केले जाईल आणि योग्य त्या शेतीय-तंत्रज्ञानाचे प्रयोगशाळेतून-जमीनीकडे हस्तांतरण सुलभ करून दिले जाईल. याकेंद्राकडून एकात्मिक यांत्रिकी मॉडेल्सची प्रात्यक्षिके देखील दाखविली जातील आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, साधने आणि यंत्रांचा वापराचे आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण देखील दिले जाईल. जेफ़ार्म सेवांचे यशस्वी पद्धतीने शेतकरी-ते शेतकरी डिजिटल कस्टम हायरिंग मॉडेलचे प्रदर्शन केले जाईल ज्यामुळे मालकी शिवाय यंत्रांचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय हे केंद्र उद्योग तज्ञ, स्टार्ट-अप, संस्था आणि शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचे एक व्यासपिठ देखील बनेल.
या कार्यक्रमाबद्दल बोलताना, ग्रुप प्रेसिडन्ट आणि टॅफ़े बोर्डाचे सदस्य असलेले, डॉ. टी.आर केशवन म्हणाले,“आमचे ध्येय हे सुयोग्य शेती करता येण्याचे असून जमीन आणि पाण्याचा स्त्रोतांची सुरक्षितता करण्याचे देखील आहे. आम्हाला शेतीय समाजाचा विविध गरजांची सखोल जाण असून; आम्हाला हे ही माहिती आहे की ज्ञान-एकमेंकांमध्ये वाटल्याने यांत्रिकीकरणाची अधिकाधिक देवाण घेवाण आणि विस्तार होणार आहे. ICRISAT चा कुशलतेसह, आम्ही या आधुनिकता परिणामकारक पद्धतीने, अगदी शेवटचा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू याची आम्हाला खात्री आहे.”
ICRISAT चे डायरेक्टर जनरल असलेले, डॉ. हिमांशू पाठक म्हणाले, “आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरण फ़ार महत्वाचे आहे आणि या भागात प्रगती केल्याशिवाय, आपल्याला विकसित भारताचे ध्येय साध्य करता येणार नाही. या एकत्रित येण्याने फ़क्त यांत्रिकीकरणालाच प्रोत्साहन मिळणार नसून रासायनिक वापर, मजूरांवरील विसंबूनता आणि पर्यावरणीय परिणामांना देखील आधुनिक संशोधनाचा माध्यमाने कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आमचे ध्येय हे भारता पलिकडे जाण्याचे असून, आम्हाला कल्पकतेचे हे प्रमाण अफ़्रिकेपर्यंत देखील न्यायचे आहे.”
Comments
Post a Comment