लाइफफर्स्‍ट

तंबाखूचे सेवन करणा-यांसाठी कोविड-१९ दरम्‍यान तंबाखू सोडण्‍याची अगदी योग्‍य वेळ
मुंबई२८ एप्रिल २०२०कोणत्‍याही वेळी कोणत्‍याही प्रकारामध्‍ये तंबाखूचे सेवन घातक आहे. संपूर्ण जगामध्‍ये कोरोनाव्‍हायरस महामारीने थैमान घातले असताना तंबाखूचे सेवन अधिक घातक ठरत आहे.
सिगारेट्स, विड्या, ई-सिगारेट्स, हुक्‍का यांसारख्‍या धूम्रपान उत्‍पादनांचा वापर, तसेच गुटखा, खैनी, मावा, खर्रा यांसारख्‍या तंबाखूच्‍या स्‍मोकलेस उत्‍पादनांचे सेवन केल्‍याने व्‍यक्‍तींना विषाणूचा संसर्ग होण्‍याचा धोका अधिक आहे.
तंबाखूच्‍या सेवनामुळे पुढील धोक्‍यांची शक्‍यता आहे:
१.     चेहरा व तोंडाला सतत हातांच्‍या बोटांचा (कदाचित बोटे संसर्गित असू शकतात) स्‍पर्श होऊ शकतो
२.     तोंडासह धूम्रपान उत्‍पादनांचा (कदाचित ते संसर्गित असू शकतात) संपर्क
३.     सिगारेट्स, विड्या, ई-सिगारेट्स, हुक्‍का इत्‍यादी सारखी तंबाखूजन्‍य उत्‍पादने शेअर करण्‍यासह इतरांसाठी खैनी किंवा मावा तयार केल्‍यानंतर संसर्ग होण्‍याचा धोका
४.     धूम्रपान व तंबाखूच्‍या सेवनाने होणा-या इम्‍यूनोसप्रेशनमुळे फुफ्फुस व छातीमध्‍ये संसर्ग होण्‍याचा उच्‍च धोका. याचा अर्थ असा की, धूम्रपान न करणा-या लोकांच्‍या तुलनेत धूम्रपान करणा-या लोकांना कोविड-१९ संसर्ग होण्‍याचा उच्‍च धोका आहे
५.     धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्‍या पेशींमध्‍ये कोरोना विषाणू प्रवेश करण्‍यास कारणीभूत ठरणा-या एंझाइम्‍समध्‍ये वाढ होत कोविड-१९ संसर्ग होण्‍याचा धोका वाढू शकतो
धूम्रपान न करणा-या व्‍यक्‍तींच्‍या तुलनेत धूम्रपान करणा-या व्‍यक्‍तींमध्‍ये क्रोनिक ऑब्‍स्‍ट्रक्टिव्‍ह पल्‍मनरी डिसीज - सीओपीडी (फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे), हृदयविषयक आजार, इतर आजारांमुळे वाढू शकणारा दमा असे आरोग्‍यविषयक समस्‍या असतात. या धूम्रपान करणा-या व्‍यक्‍तींसाठी संसर्ग होण्‍याची शक्‍यता आजार होण्‍याचा धोका वाढवते आणि ते अधिक घातक होण्‍याची शक्‍यता देखील वाढते. धूम्रपान करणा-या व्‍यक्‍तींना विषाणूचा संसर्ग झाला तर न्‍यूमोनिया होण्‍याचा उच्‍च धोका आहे. कोरोना विषाणूमुळे अनेक आजार होऊ शकतात आणि उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह, धूम्रपानाशी संबंधित सीओपीडी असे आजार असलेल्‍या लोकांचा मृत्‍यू होण्‍याचा धोका उच्‍च आहे.
तंबाखू सेवन करणा-या व्‍यक्‍ती (विशेषत: स्‍मोकलेस तंबाखू सेवन करणारे) थुंकीच्‍या माध्‍यमातून आजार पसरवण्‍यास कारणीभूत ठरू शकतात. संसर्गित व्‍यक्‍ती खोकल्‍यास, शिंकल्‍यास, बोलताना, थुंकल्‍यास नाक किंवा तोंडामधून बाहेर पडणा-या लहान तुषा-यांमधून कोविड-१९चा प्रसार होऊ शकतो. हे तुषारे पृष्‍ठभागांवर काही तासांसाठी किंवा काही दिवस टिकून राहू शकतात. इतरांनी अशा पृष्‍ठभागांना स्‍पर्श करून डोळे, नाक किंवा तोंडाला स्‍पर्श केला तर त्‍यांना देखील संसर्ग होऊ शकतो.
म्‍हणून धूम्रपान किंवा स्‍मोकलेस अशा कोणत्‍याही प्रकारात तंबाखूचे सेवन केल्‍याने संसर्ग होण्‍याचा धोका वाढतो, इतर आजार होण्‍याचा धोका वाढतो आणि संसर्ग सर्वत्र पसरण्‍याचा धोका देखील वाढतो.
हे पाहता भारतातील अनेक राज्‍यांनी अंशत: किंवा पूर्णत: तंबाखूचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्‍यावर बंदी आणली आहे. काही राज्‍ये व जिल्‍ह्यांनी तंबाखू उत्‍पादनांचे निर्माण व विक्रीवर देखील तात्‍पुरती बंदी आणली आहे.
परिणामत: तंबाखूचे सेवन करणा-या अनेक व्‍यक्‍तींना तंबाखूजन्‍य उत्‍पादने उपलब्‍ध होऊ शकली नाहीत. या अहेतूक संयमामुळे लक्षणे न पसरण्‍यामध्‍ये मदत झाली आहे. तसेच ही तंबाखू सोडण्‍याची अगदी योग्‍य वेळ आहे. तंबाखू सोडल्‍यामुळे कोरोना विषाणूच्‍या सध्‍याच्‍या परिणामांपासून तुमचे स्‍वत:चे, कुटुंबांचे व समुदायाचे मोठ्या प्रमाणात संरक्षण होण्‍यास मदत होईलच, तसेच तुमचे आरोग्‍य देखील सुधारेल आणि हृदयविषयक आजार, कर्करोग, फुफ्फुसाचा आजार आणि इतर तंबाखू-संबंधित आजारांचा धोका देखील कमी होईल.
लाइफफर्स्‍ट हा नरोतम सेखसारिया फाऊंडेशनने सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनसोबत सहयोगाने सुरू केलेला तंबाखू संबंधित उपचार उपक्रम आहे. हा उपक्रम अनुभवी समुपदेशकांकडून तंबाखू निर्मूलन समुपदेशन मिळण्‍याची सुविधा देतो. धू्म्रपान करणा-या, तसेच स्‍मोकलेस तंबाखूचे सेवन करणा-या व्‍यक्‍ती आमच्‍या समुपदेशकाशी संवाद साधण्‍यासाठी खाली दिलेल्‍या कोणत्‍याही हेल्‍पलाइन क्रमांकावर फोन करू शकतात आणि तंबाखूचे सेवन सोडण्‍यासाठी मोफत फॉलो अप फोन कॉल्‍सच्‍या माध्‍यमातून विनामूल्‍य मार्गदर्शन मिळवू शकतात.
लाइफफर्स्‍ट हेल्‍पलाइन क्रमांक
·         इंग्रजी, हिंदी, मराठी - 9820066665
·         इंग्रजी, हिंदी - 9820066661
·         हिंदी, मराठी - 7506273133, 9320277527

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..