मेरीटनेशन

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी दरम्यान विद्यार्थ्यांना साह्य करण्याकरिता मेरीटनेशनकडून इयत्ता 6-12 साठी मोफत ऑनलाइन लाइव्ह कोर्स उपलब्ध
  • टाळेबंदी सुरू झाल्यापासून ॲप इंस्टॉल करण्यात 400% वृद्धी  
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांनी 1 लाख तासांहून अधिक कालावधीच्या लाइव्ह वर्गांना उपस्थिती लावली
  • आजवर 1.4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी मोफत लाइव्ह क्लास कोर्समध्ये सहभाग नोंदवला
  • मेरीटनेशन्स मोफत ॲपवर लाइव्ह क्लासेसचा लाभ घेता येईल
    28 एप्रिल, 2020कोविड-19 चा उद्रेक आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारतातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांवर परिणाम झाला. याच परिस्थितीत सराव परीक्षांसाठी अग्रेसर नाव असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)ची उपकंपनी आणि भारतीय शिक्षण क्षेत्रातील नामांकीत मेरीटनेशनच्या वतीने टाळेबंदीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये याकरिता विशेष मोफत लाईव्ह क्लासेसचे आयोजन केले.
    मेरीटनेशनने लाइव्ह क्लासेसचा शुभारंभ केला असून इयत्ता 6-12 वी’च्या विद्यार्थ्यांकरिता संपूर्ण अभ्यास स्त्रोत टाळेबंदी उठेपर्यंत मोफत उपलब्ध करून दिले आहेत. मेरीटनेशनद्वारे उपलब्ध करून देण्यात येणा-या महत्त्वपूर्ण अभ्यास स्त्रोतांमध्ये समावेश आहे:
  • संकल्पना समजावून सांगणारे व्हिडियो, निमेशन
  • विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन करणाऱ्या विविध प्रकारच्या चाचण्या आणि स्मार्ट रिपोर्ट्स
  • तज्ज्ञांनी उत्तर तयार केलेली 40 लाख प्रश्नांचा समावेश असलेली डेटा बँक उपलब्ध
  • सोप्या पद्धतीने संदर्भ घेण्याकरिता साह्यभूत मजकूर आणि डाऊनलोड करता येईल अशा रिविजन नोट्स
  • एनसीईआरटी आणि इतर अभ्यासपुस्तकांकरिता पर्याय
मेरीटनेशनच्या वतीने जेईई/एनईईटी परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाइव्ह क्लासेसचे मोफत आयोजन. त्याशिवाय, मेरीटनेशनद्वारे घेण्यात येणा-या मोफत लाइव्ह क्लासेसविषयी अधिक माहिती इथे पाहता येईल – www.meritnation.com/liveclass
अंगीकारण्याची क्षमताच यशाकरिता महत्त्वपूर्ण ठरते असा विश्वास मेरीटनेशनचे संस्थापक आणि सीईओ पवन चौहान यांना वाटतो. "भारतातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन अभ्यासाकरिता ऑनलाइन येत आहेत. आमच्या लाइव्ह क्लासेसच्या लोकप्रियतेबद्दल सांगायचे झाले तर दरदिवशी हजारो विद्यार्थी दाखल होत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन लर्निंगची संकल्पना प्रचंड आवडली आहे. मेरीटनेशनच्या वतीने टेक प्लॅटफॉर्मवर ही टाळेबंदी उठेपर्यंत मोफत लाइव्ह क्लासची सोय करण्यात आली. विद्यार्थी आपापल्या घरात बसून अभ्यास करतील याची खातरजमा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने सर्व एज्युकेटर मेरीटनेशनशी संपर्क साधू शकतात”, असे ते म्हणाले.  
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)चे संचालक आणि सीईओ आकाश चौधरी म्हणाले की, “आमच्या एईएसएल परिवारात ‘विद्यार्थ्यांना प्राधान्य कायम अग्रभागी राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना घरातून शिक्षण पुढे सुरू ठेवायचे आहे, त्यांच्याकरिता साह्य उपलब्ध करून देताना मला आनंद वाटतो. कोविड-19 व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना आमचा टेक प्लॅटफॉर्म शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी विपरीत परिस्थितीवर मात करतो आहे.”
 मेरीटनेशनच्या मोफत लाइव्ह क्लासेसचे ठळक मुद्दे
  • हे वर्ग गणित, विज्ञान, एसएसटी आणि हिंदीकरिता आहेत
  • इन-क्लास प्रश्नमंजुषा आणि मत चाचणीकरिता संवादात्मक वर्ग
  • एखादेवेळी विद्यार्थी गैरहजर राहिल्यास रेकॉर्डेड लेक्चरची सोय
  • वर्ग संपल्यानंतर कनेक्ट अॅपद्वारे कार्यतत्पर शिक्षकांद्वारे शंकांचे निरसन
  • लाइव्ह क्लासची संबंधित नियमित सराव अभ्यास आणि महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांना पाठवली जातील
  • लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅब्लेट किंवा स्मार्ट फोन अशा उपकरणांद्वारे वर्गांचा लाभ घेणे शक्य
मेरीटनेशनचे मोफत ॲप डाऊनलोड करून या लाइव्ह क्लासचा लाभ घेणे शक्य आहे. सध्या विद्यार्थी वर्गात हे ॲप वेगाने लोकप्रिय झालले दिसते. मेरीटनेशनच्या मोफत लाइव्ह कोर्सचा लाभ घेणारा यश वर्धन सांगतो की, “कोविड-19 महामारीच्या कालावधीत या ॲपमुळे माझा अभ्यास सुलभ केला.”
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडची भारतातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून एज्यु-टेक कंपनी मेरीटनेशन K12 विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक साह्य पुरवते. जानेवारी 2020 मध्ये इंफो एज (इंडिया) लिमिटेड सोबत निर्णायक करार करून त्यांनी ॲप्पलेक्ट लर्निंग सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड संपादित केली.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..