लॉकडाउनमध्ये घरीच निरोगी राहण्यासाठी 'फिटर'चे प्रोत्साहन
~ ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजची घोषणा; ५ विजेत्यांना मिळणार १ लाख रुपयांचे बक्षीस ~
मुंबई, ३० एप्रिल २०२०: लॉकडाउनमुळे देशभरातील जिम आणि फिटनेस सेंटर बंद आहेत. सध्या लोक घरातच कैद असल्यामुळे शारीरिक हालचाली मर्यादित आहेत. अशा स्थातिती त्यांनी निरोगी राहणे खूप महत्त्वाचे आहे. या काळात लोकांची मदत करण्यासाठी, त्यांनी निरोगी जीवनशैली अनुसरावी याकरिता प्रेरणा देण्याच्या उद्देशाने ऑनलाइन फिटनेस मंच फिटरने (FITTR) बहुप्रतीक्षित ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजच्या दहाव्या पर्वाची घोषणा केली आहे.
या पर्वाची सुरुवात १ मे पासून होईल आणि हे १२ आठवड्यांचे चॅलेंज कंपनीच्या फिटनेस अॅपवर होस्ट केले जाईल. या चॅलेंजसाठी नोंदणी मोफत असून १८ वर्षांच्या पुढील कोणतीही व्यक्ती यात कोणत्याही ठिकाणाहून भाग घेऊ शकते. या चॅलेंजच्या माध्यमातून ५ विजेत्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या रोख रकमेचे पारितोषिक दिले जाईल .
फिटरचे संस्थापक जितेंद्र चौकसे म्हणाले, ‘‘सध्या संपूर्ण जग कोव्हिड-१९ या महामारीच्या रुपात एका मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहे. अशा वेळी सकारात्मक आणि प्रेरित राहणे महत्त्वाचे आहे. या ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज -१० चा उद्देशदेखील हा आहे. लोक या आव्हानात भाग घेण्यासाठी प्रेरित व्हावेत आणि त्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आपण सर्वजण एकत्र आहोत आणि आपले आरोग्य आणि फिटनेसमध्ये गुंतवणूक करू शकतो, ही एक चांगली गोष्टी आहे.'
ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज फिटरच्या धोरणांचे प्रतिनिधीत्व करते. कोणतीही व्यक्ती फिट राहू शकते, यावर आमचा दृढ विश्वास आहे. फक्त ती मानसिकरित्या तयार पाहिजे. फिटर अॅप निरोगी आणि फिट राहण्यासाठी आवश्यक ते सर्व टूल्स मोफत देते. तसेच फिटर कोच दररोज मोफत ऑनलाइन लाइव्ह सेशन्स आयोजित करत असून लोकांना या काळात फिट राहण्यासाठी मदत करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight