मोकळा वेळ मिळाल्याने मी आनंदी आहे - तेजश्री प्रधान
अग्गंबाई सासूबाई’ मालिका हि अल्पावधीतच खूप लोकप्रिय झालीसध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेतया मालिकेतील शुभ्रा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या काय करतेय हे जाणून घायची उत्सुकता प्रेक्षकांना आहेत्यासाठी तेजश्री सोबत साधलेला हा खास संवाद
लॉकडाऊनमुळे मालिकेचं शूटिंग थांबलय आणि इतकी मोठी सुट्टी मिळाली आहेइतका मोकळा वेळ मिळाल्यावर कसं वाटतंय?
गेल्या १२ वर्षात मला इतका मोकळा वेळ मिळाला नव्हतामाझं सतत काहीना काही सुरु होतंत्यामुळे मला बरं वाटतंयसध्या मी फक्त आराम करतेयमिळालेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग स्वतःसाठी करून घेतेयरिकामा वेळ आणि आराम या दोन्ही गोष्टींचा आनंद घेतेयएरवी रोजच्या अत्यंत व्यग्र दिनक्रमामुळे डाएटकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे आता डाएटकडेही लक्ष देतेयरोज थोडा वेळ योगा करते आणि बाकी वेळेत नवीन वेब सिरीज आणि चित्रपट बघते.
लॉकडाऊनमध्ये घरी राहून तू काय मिस करतेय?
खरं सांगायचं तर जी विश्रांती मिळाली आहे त्याची मला गरज होतीसक्तीची सुट्टी का होईनापण मोकळा वेळ मिळाल्याने मी आनंदी आहेपण घरातून बाहेर जाणंफिरणं या गोष्टींची आठवण येते.
तू सध्या सोशल मीडियापासून दूर आहेसत्यामागे काय कारण आहे?
घरात असून देखील सोशल मीडियावर कमी असण्याचं कारण म्हणजे हा वेळ माझा आहे आणि सोशल मीडियावर राहून तो फुकट घालवणे मला पटत नाहीएरवी वेळेअभावी खूप गोष्टी करायच्या राहून गेल्या आणि त्या करायची संधी आता मिळाली आहेतर त्या संधीचं सोनं करायला हवंखरं सांगायचं तर सोशल मीडियावर लाईव्ह वगैरे येणं मला फारसं आवडत नाहीएकदा सगळं पूर्ववत झालं कि हे सर्व करायचंच आहेम्हणून सध्या मी सोशल मीडियापासून जरा लांब आहे.
लोकांना तू काय सांगशील?
सगळ्यांनी प्लिज घरीच थांबाउगाच बाहेर जाऊ नकाआता जर शिस्त पाळली आणि घरी थांबलो तर लवकर बाहेर जात येईलपण जर आताच्या घडीला बाहेर गेलो तर पुढे अजून घरीच थांबावं लागेल

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..