घरबसल्या इंटरनेटद्वारे ​आरवली श्री देव वेतोबाचे 'लाईव्ह दर्शन​'

​आरवली श्री देव वेतोबाचे आता होणार 'लाईव्ह दर्शन​'
सावंतवाडी​ : वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील प्रसिध्द श्री देव वेतोबा देवाचा वाढदिवस सोहळा मंगळवार दि. २८ एप्रिल २०२० रोजी  संपन्न होणार आहे. कोरोना व्हायरस च्या संसर्गामुळे सर्वत्र संचारबंदी चा आदेश आहे. त्यामुळे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव वेतोबाचे लाईव्ह दर्शन सर्व भक्त मंडळीना घरबसल्या मिळावे या दृष्टीने श्री देव वेतोबा देवस्थान विश्वस्त मंडळाने इंटरनेट द्वारे श्री देव वेतोबाच्या दर्शनाची व्यवस्था केलेली आहे.
​   ​सध्याची कोरोनाची परिस्थिती पहाता अशा परिस्थितीत श्री देव वेतोबाचा वाढदिवस सोहळा जाहीररित्या साजरा करणे शक्य होणार नाही. तसेच मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवणे शक्य होणार नाही.  तरी सर्व भक्तमंडळीनी घरी बसून दर्शनाचा लाभ घ्यावा व श्री देव वेतोबाचे आशिर्वाद घ्यावेत. यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आपण सर्वजण घरी बसूनच या कोरोना रुपी जागतिक संकटातून ‘तू सर्वांची लवकरच मुक्तता कर’ अशी श्री देव वेतोबा चरणी प्रार्थना करुया. सर्वांसी सुख लाभावे तशी आरोग्य संपदा कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये अशी प्रार्थना आपण सर्वांनी या दिवशी करूया असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान, आरवली अध्यक्ष जयवंत बाबुराव राय यांनी केले आहे.
  • संकेतस्थळ : http://vetobadevasthanarawali.org/

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO