‘ॲमेझॉन प्राइम’वर प्रवास हा मराठी चित्रपट...

 ‘प्रवास’ ॲमेझॉन प्राइमवर
सध्या ऑनलाइन प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या मनोरंजक चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. चित्रपटांच्या या रंजक प्रवासात एका आनंददायी प्रवासाची गोष्ट प्रेक्षकांना आता अनुभवता येणार आहे. आयुष्याचे मर्म सांगणारा आणि अशोक  सराफ, पद्मिनी कोल्हापूरे यांच्या अभिनयाने नटलेला ‘प्रवास’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राइम’ वर पहायला मिळणार आहे. ओम छंगानी फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन शशांक उदापूरकर यांनी केले आहे.
सरळमार्गी आयुष्य जगणारे अभिजात इनामदार आयुष्याच्या एका टप्प्यावर स्वत:चा असा वेगळा निर्णय घेतात. हा निर्णय त्यांच्या आयुष्याला व त्यांच्या कुटुंबाला कशी कलाटणी देतो हे दाखवतानाचआयुष्यातील प्रत्येक लढाई निर्धाराने लढण्यातच  खरी मजा असते, हाच खरा प्रवास असतो हा विचार नकळतपणे चित्रपट देतो. अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत या चित्रपटात विक्रम गोखलेरजत कपूरशशांक उदापूरकर आदि कलाकार आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..