आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा
आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधुन अक्षरधाम स्वामीनारायण मंदिर,पवई यांनी कोविड-१९ च्या संक्रमणापासून वाचण्यासाठी  योगाचा एक वेबिनार प.पू.भरतभाई व प.पू.वशीभाई यांच्या संकल्पनेतुन आयोजित केला होता.कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलनाने झाली.सदर वेबिनारला प्रख्यात योग शिक्षक दिपकभाई परमार यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी उपस्थितांकडून काही ठराविक आसने करुन घेतली.सदर शिबीरात आत्म योग फाऊंडेशन चे आचार्य प्रणवदत्त,श्री.जे.पी.शेट्टी वकील तसेच पो.नि.कांबळेसाहेब यांनी सहभाग घेतला.सदर कार्यक्रमास मंदिराच्या संत भगिनीही उपस्थित होत्या.सहभागींनी योगासनांमुळे सकारात्मक उर्जा निर्माण होऊन करोना ची भिती कमी होण्यास मदत होईल असे सांगितले.शेवटी हिरानंदानी हॉस्पिटलचे डॉ.नीरज दुलारा यांनी कोविड-१९ संदर्भात अॉनलाइन बहुमोल मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025