फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांना पुण्यतिथिनिमित्त, आरएसवीपी मूव्हीजने अभिनेता विक्की कौशलचा नवा लुक सादर करून वाहिली श्रद्धांजली!
मागील वर्षी, जेव्हा फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेतील विक्की कौशल याचा पहिला लुक समोर आला होता, आपण सगळेच स्तिमित झालो होतो. आणि आज या महान व्यक्तित्वाच्या पुण्यतिथिनिमित्त, त्यांना श्रद्धांजली वाहताना, त्यांच्या चरित्रपटाच्या निर्मात्यांनी विक्की कौशलचा आणखी एक लुक सादर केला आहे. जो स्क्रीनवर सॅम माणेकशॉ यांची भूमिका निभावण्यासाठी सज्ज झाला आहे.
आरएसवीपी मूव्हीजने आपल्या सोशल मीडियावर या फील्ड मार्शलला श्रद्धांजली वाहताना हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर यावेळी टाकण्यात आलेल्या या व्हिडीओमधील विक्कीच्या नव्या लुकने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. यासोबतच निर्माता रोनी स्क्रूवाला, निर्देशक मेघना गुलज़ार, अभिनेता विक्की कौशल यांनी देखील आपापल्या सोशल मीडियावरून फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना श्रद्धांजली वाहिली.
अभिनेता विक्की कौशल लवकरच मेघना गुलज़ार द्वारे दिग्दर्शित चरित्रपटात फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO