उर्मिला झळकणार श्यामची आई सिनेमात
रौद्र सिनेमानंतर उर्मिला झळकणार श्यामची आई सिनेमात
या सिनामबद्दल उर्मिला सांगते ‘’एखाद्या कलाकारासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकेल. 1 एप्रिलला माझा रौद्र सिनेमा रिलीज झाला, 3 एप्रिलला लगेच श्यामची आई या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. नावाजलेले प्रोजेक्ट , नवीन टीम, नावाजलेले कलाकार, त्यातही पहिल्याच सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक सुजय डहाके, त्यामुळे सुरुवातीला थोडं दडपण होतं. पण,प्रत्यक्षात सेटवरचा अनुभव मला खूप शिकण्यासारखा होता.’’
साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या मूळ कथेवर आधारीत हा चित्रपट आहे. या सिनेमाबद्दल उर्मिला पुढे सांगते, “या चित्रपटाचा काळ वीस – तीसच्या दशकातील असल्याने त्या काळची भाषा, देहबोली या सगळया गोष्टी मला शिकायला मिळाल्या. या भूमिकेसाठी मी जीव ओतला असं म्हणेन. सुजय सरांनी मला खूप मदत केली. भूमिकेची लांबी किती आहे यापेक्षा कोणती भूमिका आहे ? टीम कोणती आहे ? हेही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”
श्यामची आई सिनेमातल्या उर्मिलाच्या भूमिकेबद्दल आणि सिनेमाबद्दल अधिक माहिती लवकरच समोर येईल.
Comments
Post a Comment