‘सृजन द क्रिएशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका महोत्सव
‘सृजन द क्रिएशन’ ही संस्था येत्या १५ मे रोजी २ वर्षांची होतेय. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरच्या सृजनशील माणसांचे कुटुंब बनले. आज जवळपास १६ ऑनलाईन आणि ५ प्रत्यक्षातल्या कार्यशाळा झाल्या. त्यातून हे कुटुंब विस्तारत आहे. वय वर्ष ७ ते ७० ह्या वयोगटातली लोकं इथं एकत्र येऊन अनेक activities सोबत एकमेकांच्या वैयक्तिक कौटुंबिक सुखदुःखात सामील होत आहेत. अनेक मान्यवरांनी ‘हातचं काही राखून न ठेवता’ त्यांना मार्गदर्शन केलं, करीत आहेत.
येत्या रविवारी १५ मे रोजी सकाळी १०.०० ते रात्री ११.०० असा ९ एकांकिकांचा एक भव्य एकांकिका महोत्सव प्रबोधनकार ठाकरे, लघु नाट्यगृह, बोरिवली येथे सृजनचे कलाकार साजरा करणार आहेत.
या महोत्सवात रमेश पवार, आशिष पाथरे, स्मिता पोतनीस, डॉ. स्मिता दातार आणि राजेश देशपांडे यांच्या विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकप्राप्त एकांकिका सादर होणार असून रसिकांनी या एकांकिकांचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख राजेश देशपांडे ह्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment