एबीएफआरएलच्या जयपोरने सादर केले पैठणीपासून प्रेरित 24 कॅरेट सोन्यातील वैशिष्ट्यपूर्ण होमवेअर कलेक्शन

'व्हॅलीज ऑफ सह्याद्री' होमवेअर कलेक्शन हे अशा प्रकारचे पहिलेच डिझाइन असून यात महाराष्ट्रातील राजघराण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पैठण भागातील टेक्स्टाइल डिझाइनची सांगड घातली आहे

मुंबई, नोव्हेंबर 24, 2022 : कलाकुसर व कारागीरीसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतातील जयपोरने 'व्हॅलीज ऑफ सह्याद्री' हे त्यांचे नवे होम कलेक्शन सादर केले आहे. महाराष्ट्रातील पैठणीमधील सुंदर डिझाइन्सपासून या कलेक्शनसाठी प्रेरणा घेतली आहे. होमवेअर कलेक्शनमध्ये पेशव्यांच्या काळात प्रसिद्ध असलेल्या आसवलीने तयार केलेले दिमाखदार पैठणी ठसे वापरून हे कलेक्शन घडविले आहे. या कलेक्शनमध्ये अप्रतिम चारुता सीरिज असून 24 कॅरेट सोन्याने अलंकारित केले आहे. त्यामुळे हा घरच्यासाठी एक उत्कृष्ट संग्रह आहे.

पारंपरिक कारागिरीचे आणि हे नक्षीकाम जिवंत करणाऱ्या कारागीरांचे संवर्धन करण्याच्या प्रेरणेतून डी डिझाइन तयार करण्यात आली आहेत. हे कलेक्शन म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सौंदर्याचा प्रवास आहे.  यात महाराष्ट्रातील कला, हस्तकला, ऊर्जा व जीवनशैली यांची या संपूर्ण उत्पादन श्रेणीत सांगड घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या संग्रहात माश्रू, हिमरू आणि बराक डिझाइन्ससारख्या समृद्ध सांस्कृतिक कलांचा समावेश करण्यात आला आहे.

जयपोरच्या 'व्हॅलीज ऑफ सह्याद्री' कलेक्शनमध्ये नाजूक पोर्सेलिन टेबल व सर्व्हवेअरचा समावेश आहे या महाराष्ट्रातील वारसा असलेल्या संकल्पना, पैठणीच्या विणकामातील आकृतिबंध, ग्रामीण शैलीतील सिरॅमिक्स, फुलांची डिझाइन्स दगडी भांड्यांमध्ये समावष्ट करण्यात आल्या आहेत. सणासुदीच्या हंगामासाठी या सर्व वैशिष्ट्यपूर्ण भेटवस्तू ठरतात. उत्सवी दिवसांसाठी कल्पकतेने डिझाइन केलेल्या पितळ्याच्या भांड्यांमध्ये बारीक नक्षीकाम असलेल्या प्रभावळी, हँगिंग लॅम्प्स (लोंबकळणारे दिवे) आणि देवदेवतांच्या मूर्तींचा समावेश आहे.

या लाँचबद्दल आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्या जयपोरच्या बिझनेस हेड रश्मी शुक्ला म्हणाल्या, "आम्ही आमचे होमवेअर कलेक्शन महाराष्ट्रातील समृद्ध वारसा लाभलेल्या पैठणला समर्पित करत आहोत. पैठणीकडून प्रेरणा घेऊन हे कलेक्शन आम्ही घडविले आहे. आता ग्राहक 'व्हॅलीज ऑफ सह्याद्री'सह शाही वारशाचा स्पर्श असलेल्या वस्तू आपल्या संग्रही ठेवू शकतात. हे खास टेक्स्टाइल प्रिंटमधून प्रेरणा घेऊन सुंदर आकृतिबंध असलेले होम डेकोर कलेक्शन आहे. या डिनरवेअरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या नक्षीकामाचा स्पर्श झाला आहे. त्यामुळे आमच्या कस्टमरच्या घरात या वैशिष्ट्यपूर्ण ऐवजाची भर पडणार आहे. पैठणी, हिमरू आणि चारुतासारख्या कारागिरीला पुनरुज्जीवित करणे आणि समकालनी वळण देत आमच्या ग्राहकांसाठी ही कारागिरीन पुन्हा सादर करणे हे या कलेक्शनचे उद्दिष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight