इंशुरन्सदेखो च्या प्लॅटफॉर्मवर आता एलआयसी पॉलिसी उपलब्ध..
इंशुरन्सदेखो च्या प्लॅटफॉर्मवर आता एलआयसी पॉलिसी उपलब्ध
इंशुरन्सदेखो, या भारतातील अग्रगण्य विमाटेक कंपनीने भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) सोबत महत्त्वपूर्ण भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीमुळे, एलआयसी ची उत्पादने (विमा) संपूर्ण भारतातील इंशुरन्सदेखो च्या प्लॅटफॉर्मवर सर्व ग्राहकांना त्वरित उपलब्ध होतील.
इंशुरन्सदेखो चे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक श्री अंकित अग्रवाल म्हणाले, “आम्हाला एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीसोबत भागीदारी करताना आनंद होत आहे. या भागीदारीद्वारे, भौगोलिक किंवा स्तर विभाजनाची पर्वा न करता आम्ही विम्याचे लोकशाहीकरण करण्याचे आणि ते सर्वांसाठी प्रवेशयोग्य बनविण्याचे आमचे ध्येय्य साध्य करू शकू. एलआयसी ही भारतातील सर्वात विश्वासार्ह विमा प्रदाता आहे आणि त्यांच्याशी सहकार्य केल्याने देशातील दुर्गम खेड्यांमध्ये १००% पोहोचण्याचे आमचे अधिक सुलभ होईल. आमचे भागीदार, विमा सल्लागार आणि ग्राहकांसाठी नवीन बेंचमार्क सेट करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान, पीओएसपी भागीदार पद्धती आणि आधुनिकतेचा वापर करू.”
त्याच्या स्थापनेपासून, इंशुरन्सदेखोने लक्षणीय वाढ केली आहे आणि या आर्थिक वर्षाचा शेवट रु. ३,००० कोटी वार्षिक प्रीमियम रन-रेटने होणार आहे. हे भारतातील ९३% पिन कोड कव्हर करणार्या १,३०० हून अधिक शहरांमध्ये अस्तित्वात आहे आणि लवकरच देशामध्ये १००% प्रवेश स्थापित करण्यासाठी उर्वरित ठिकाणे कव्हर करण्याचे काम करत आहे. सध्या १० भारतीय प्रत्येक मिनिटाला इंशुरन्सदेखो कडून पॉलिसी खरेदी करतात.
इंशुरन्सदेखोच्या प्लॅटफॉर्मवर ४५ विमाकर्त्यांची ३३०+ उत्पादने आहेत. एलआयसी सह भागीदारीमुळे इंशुरन्सदेखोला संपूर्ण देशभरातील ग्राहकांना संपूर्ण विमा उत्पादने प्रदान करणे शक्य होईल.
Comments
Post a Comment