घराघरात घडणाऱ्या सासू सूनांच्या भांडणाना बघूया...

घराघरात घडणाऱ्या सासू सूनांच्या भांडणाना बघूया विनोदाच्या आरशात !

आयुष्यात आपल्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं काय किंवा आईला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं कायएकदा मुलगी सून झाली की तिच्यासाठी आपली आई सासूच असते. सासूची आई होणं तसं दुरापास्तच. अशाच एका खोडकर सुनेच्या आणि तिच्या खोडीवर कुरघोडी करणाऱ्या खट्याळ मिश्किल सासू मधल्या नात्याची खुमासदार गोष्ट म्हणजे "अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई" आजच्या आधुनिक काळातसासू सूने मधील नातंएकमेकींशी कधी भांडत तर कधी एकमेकींना चिमटे काढत कसं बहरत जातंयाचा धमाल प्रवास यात बघायला मिळेल. "तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेनाअसं हे दोघी मधलं नातं वेगेवगळ्या प्रसंगातून धमाल उडवत असताना त्यांच्या सासू सुनेच्या नात्यावर सासऱ्यांची खुमासदार टिप्पणी त्या नात्याचे विविध पैलू उलगडून दाखवते. ह्या मालिकेत खट्याळ सासूच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी असणार आहेत तर खोडकर सून साकारतेय स्वानंदी टिकेकर.

सासू सुनेच्या नात्यामध्ये येणारे तीढे विनोदी ढंगाने सोडवत हसत खेळत जगताना त्यांच्यातल्या नात्याची वीण घट्ट होत जाते. घराघरात घडणाऱ्या सासू सूनांच्या भांडणाना विनोदाच्या आरशात बघण्याची संधी ही गोष्ट प्रेक्षकांना मिळवून देईल याची नक्की खात्री वाटते.

पाहायला विसरू नका अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई?” २१ नोव्हेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..