गुन्हेगारी जगताचा वेध घेणारी दिग्दर्शक समित कक्कडची ‘धारावी बँक’

 गुन्हेगारी जगताचा वेध घेणारी

दिग्दर्शक समित कक्कडची ‘धारावी बँक

भारतातील प्रयोगशील दिग्दर्शकांची यादी केली जाईलत्यावेळी एका नावाचा त्यात नक्कीच समावेश असेल ते म्हणजे समित कक्कड़. काही दिग्दर्शकांची निर्मिती ही एक स्टेटमेंट असते. दृश्यात्मकतेची चांगली जाणमाध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक समित कक्कड यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे. स्वत:ला पडलेले प्रश्नआजबाजूच्या समस्या दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपल्या सिनेमातून आजवर मांडल्या आहेत. 'हुप्पा हुय्याहाफ तिकीटआयना का बायना', ‘आश्चर्यचकित’, ‘इंदौरी इश्क, ‘३६ गुण’ यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून हे दिसून आलं आहे. 

चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम असले तरी रोजच्या जगण्यातील भाव-भावनांचे प्रतिबिंब त्यात उमटले पाहिजेहा विचार घेऊन कलाकृती निर्माण करणारे दिग्दर्शक समित कक्कड़ यांनी आपल्या आजूबाजूचे वास्तववादी विषय त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून मांडले आहेत. तरुणांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सभोवताली विषयाची मांडणी करणं ही त्यांची खासियत.

आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी’ ही धारावीची ओळख असली तरीही त्यापलीकडे तिच्या अंतरंगात बऱ्याच गोष्टी दडल्या आहेत. या गोष्टींचा मागमूस बाहेरच्यानां लागत नाही. दारिद्र्यगुन्हेगारीचं जाळ याच्या विळख्यात अडकलेली धारावी मोठया उद्योगांच केंद्रसुद्धा आहे. हे सांगत तिथल्या विश्वाची वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक समित कक्कड़ यांनी आपल्या धारावी बँक या आगामी हिंदी वेबसीरिज मध्ये केला आहे. १९ नोव्हेंबरला मॅक्स प्लेयरवर ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे.

'धारावी बैंकअपने आप में एक इंडस्ट्री है. शिपिंग पोर्ट से लेकर स्पोर्ट्स तकरियल स्टेट से लेकर पॉलीटिशियन तकथलाइवन के पैर सब जगह हैं. पर निशान कहीं भी नहीं.'' धारावीची ही ओळख करून देतानाच. गुन्हेगार आणि पोलिसांची होणारी धुमश्चक्री, तिथलं राजकारण व तिथे चालणाऱ्या धंद्याचा ऊहापोह समित यांनी धारावी बँक या वेबसीरिज मध्ये केला आहे. समितच्या मते मुंबईतील सुंदर ठिकाण म्हणजे धारावी. समित याच बालपण याच परिसरात गेल्याने हे सगळं त्यांनी जवळून अनुभवलं आहे.

धारावी बँक हि वेबसीरिज काल्पनिकच आहे पण वास्तवातील बरेच संदर्भ या सीरिजमध्ये दाखवले आहेत. झोपडपट्टी हे गुन्हेगारांसाठी मोक्याचं ठिकाण असतं आणि नेमकं तेच हेरून समित कक्कड यांनी एक उत्तम क्राइम थ्रिलर सिरीज तयार करून प्रेक्षकांसमोर आणली आहे. या वेबसीरिजची निर्मिती झी स्टुडियोची आहे. एमएक्स प्लेअरचे चीफ कंटेट ऑफिसर गौतम तलवार तर सीनियर क्रिएटीव्ह प्रोड्यूसर पेरसी जामशेदजी आहेत.

अभिनेता सुनील शेट्टी या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. गुन्हेगारी विश्वाचा सर्वेसर्वा थलाईवन’ हे पात्र सुनील शेट्टीने साकारलं आहे. याबरोबरच अभिनेता विवेक ओबेरॉय यामध्ये जेसीपी जयंत गावस्कर या पोलिस अधिकाऱ्याच्या डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे. तसेच सोनाली कुलकर्णीसंतोष जुवेकरनागेश भोसलेफ्रेडी दारूवालासिद्धार्थ मेननचिन्मय मांडलेकरजयवंत वाडकर ,शांती प्रिया, ल्यूके किनी, वामशी कृष्णन, भावना राव, समीक्षा भटनागर, श्रुती श्रीवास्तव, हितेश भोजराज, पवित्रा सरकार, रोहित पाठक सारखे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

या वेबसीरीजचे लेखन सार्थक दास गुप्ता यांचे आहे. छायांकन विजय मिश्रा तर संकलन आशीष म्हात्रेअपूर्वा मोतीवाले सहाय यांचे आहे. अॅक्शन विक्रम दहिया तर वेशभूषेची जबाबदारी किन भाटिजा यांनी सांभाळली आहे. प्रोडक्शन डिझाईन वाडिया खान, राकेश यादवतर बीजीएम अमर मोहिले यांनी केले आहे. कास्टिंग कुणाल शहा तर व्हीएफएक्स पंकज अजवानी यांचे आहे. साउंड डिझायनिंग आणि मिक्सिंग अजय कुमार पीबी यांचे आहे. समित यांच्या आजवरच्या चित्रपटांचा दर्जेदार आलेख लक्षात घेता धारावी बँक’ ही सीरिजही प्रेक्षकांचा पुरेपूर पैसा वसूल करणारी सीरिज असेल यात शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight