‘सुर्या’ विरोधात खलनायकांची फौज ...

 ‘सुर्या विरोधात खलनायकांची फौज 

चित्रपटात मुख्य नायक-नायिकेइतकाच नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचाही महत्त्वाचा वाटा असतो. नायक खलनायकाची जुगलबंदी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते. आपल्या प्रभावी अदाकारीतून नायकाला जबर आव्हान देणारा खलनायक प्रेक्षकांनाही पहायला आवडतो. आगामी सुर्या या मराठी चित्रपटात मराठी-हिंदीतील सशक्त अभिनेत्यांची फौज आपल्याला खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. सुर्या या चित्रपटाच्या नायकाचा सामना या सर्व खलनायकांशी होणार आहे. ‘सुर्या’ या चित्रपटात अखिलेन्द्र मिश्रा, हेमंत बिर्जे, हॅरी जोश, उदय टिकेकर, गणेश यादव ही मंडळी आपल्या खलप्रवृत्तीतून ‘सुर्या’ला बेजार करताना दिसतील. प्रसाद मंगेश हा युवा अभिनेता आपल्याला ‘सुर्या’च्या डॅशिंग भूमिकेत पहायला मिळणार आहे.

राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सचा सुर्या हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट ६ जानेवारीला नवीन वर्षारंभी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. हसनैन हैद्राबादवाला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

समाजात दहशत पसरवितक्रौर्याचे दर्शन घडवित हातातल्या सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करणाऱ्या खलनायकांना सुर्या कसा समोरा जातोयाची जिगरबाज कथा सुर्या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते अखिलेन्द्र मिश्रा यात ‘नारूअण्णा’ या कुविख्यात गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘रज्जाक’ या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विश्वातील डॉनची भूमिका हेमंत बिर्जे यांनी साकारली आहे. त्यासोबत हॅरी जोश हे ‘मुन्ना रेड्डी’ या डॉनच्या व्यक्तिरेखेत दिसतील. उदय टिकेकर हे तात्या पाटील या विरोधीपक्ष नेत्याच्या भूमिकेत पहायला मिळणार असून उदयसिंह मोरे ही खाकी वर्दीतल्या खलनायकाची भूमिका अभिनेता गणेश यादव यांनी साकारली आहे. अॅक्शन डिरेक्टर अब्बास अली मोघल आणि कौशल-मोझेस आहेत.

चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम, मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदममंगेश केदारहेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. तर नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्यउमेश जाधवराहुल संजीव यांचे आहेत. बाबा चव्हाणसंतोष दरेकरसंजय मिश्रादेव चौहान यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली असून सह निर्मिती प्रसाद मंगेशचेतन मंगेश यांची आहे. कार्यकारी निर्माते संग्राम शिर्के आहेत.

‘सुर्या’ या सगळ्या खलनायकांचा कसा प्रतिकार करतो हे आपल्याला ६ जानेवारीला चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..