भोईवाडा,परळ येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखी सोहळा उत्साहात संपन्न

भोईवाडा,परळ येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखी सोहळा उत्साहात संपन्न 

मुंबई - श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) भोईवाडा (शिवडी) केंद्राच्या वतीने  ब्रम्हांडनायक पालखी सोहळ्याचे आयोजन रविवार९ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. भोईवाडा राम मंदिर ते  सहकार नगर वडाळा अशी पालखी परिक्रमा मंगलमय, भक्तिमय वातावरणात पार पडली. पालखी सोहळ्यास विभागातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

 

पालखी सोहळ्यामध्ये कॉंग्रेस प्रवक्ता डॉ राजू वाघमारे, माजी नगरसेविका सौ उर्मिला पांचाळ शिवसेना, माजी नगरसेवक श्री सुनील मोरे कॉंग्रेस आदी मान्यवरांनी सहभाग घेऊन पादुका दर्शनाचा लाभ घेतला.

 

 पालखीची सांगता माजी नगरसेवक श्री अमेय अरुण घोले यांच्या विभागात झाली त्यावेळेस श्री अमेय घोले व सौ कोमलताई चौगुले- घोले यांच्या वतीने केलेल्या महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घेतला.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार