सांधेरोपण सर्जरीसाठी पुणे रोबोटीक हब..

 सांधेरोपण सर्जरीसाठी पुणे रोबोटीक हब

- लोकमान्य हॉस्पिटल आयोजित आयएसआरजेआर कॉन्फरन्स पुण्यात संपन्न

इंटरनॅशनल सिम्पोसियम ऑफ रोबोटीक जॉईंट रिप्लेसमेंट (ISRJR) ही चौथी परिषद पुणे येथे 26 ते 28 मे दरम्यान पार पडली. या परिषदेचे संयोजक अध्यक्ष तसेच देशातील रोबोटीक नी रिप्लेसमेंटचे प्रणेते लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. नरेंद्र वैद्य, गुजरातमधील सुविख्यात सांधेरोपण तज्ज्ञ,  डॉ. विक्रम शहाआंतरराष्ट्रीय किर्तीचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शरण पाटील हे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय जीवनकार्यासाठी लोकमान्य हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. विद्याधर वैद्य तसेच डॉ. अरोरा यांचा सन्मान करण्यात आला.

या परिषदेचे संयोजक आणि रोबोटीक नी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रातील वापर हा रुग्णाच्या आजारावर उपचारातील अनिवार्य भाग आहे. रोबोटीक तंत्रज्ञानाचा देशात आता सर्वत्र वापर होत असून पुणे या अग्रेसर आहे.

सुरुवातीचा आव्हानात्मक प्रवास आता प्रगतीच्या टप्प्यावर आहे. त्यामुळेच देशविदेशातील जवळपास 90 तज्ज्ञांची व्याख्याने या परिषदेत आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे रोबोटीक तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवलेल्या सर्जन्सने जगातील प्रगत रोबोटीक प्रणालीच्या सहाय्याने 19 लाईव्ह सर्जरी केल्या, ज्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.

शस्त्रक्रियेतील नेमकेपणा (प्रिसिजन)चूकता (ॲक्युरसी), (परफेक्टनेस) बिनचूकता या गोष्टी साधणे सहजशक्य झाले आहे हे सर्वांनी मान्य केले. त्यामुळे रुग्णाच्या शस्त्रक्रियोत्तर परिणामामध्ये त्याची उपयुक्तता अधिक सिध्द होते. यामुळे या शस्त्रक्रियेतील प्रगतीचा आलेख हा वाढता असुन त्यामुळे रुग्णांमध्येही या शस्त्रक्रियेस स्विकारार्हता वाढत आहे. पुण्याची भौगोलिकतावैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिकतातंत्रज्ञानाची उपलब्धताकुशल सर्जन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाजवी दरातील उपचार यामुळे देशातील तसेच परदेशातील रुग्णांची पुण्याला पसंती जास्त आहे. त्यामुळे सांधेरोपण शस्त्रातील रोबोटीक उपचारासाठी भविष्यात पुणे हेच हब असेल.

आजमितीला देशभरात दरवर्षी पंधरा हजारांहून अधिक रुग्ण रोबोटीकद्वारे उपचार घेतात. ओमानयेमेनदुबईअफ्रिका यासारख्या देशातूनही तंत्रज्ञानामुळे रुग्ण पुण्यात येत आहेत.

दीड लाखांहून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया करणारे डॉ. विक्रम शहा यांनी देशातील सांधेरोपण शस्त्रक्रियेतील तंत्रज्ञानातील प्रगतीची स्थित्यंतरे याचा प्रवास उलगडला व त्यातील विविध घटकांचा उहापोह केला.

डॉ. शरण पाटील म्हणाले की, हे तंत्रज्ञानाचे युग आहे. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे असाध्य वाटणाऱ्या उपचारातही कमालीची अचूकता आली आहे. संगणकामुळे आता डेटा संकलित करणेत्याचे पृथ्थकरण करुन विविध शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शक प्रोटोकॉल तयार करणे शक्य होईल, की जे तरुण उमद्या सर्जनना शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शक ठरेल. र्टिफिशियल इंटेजलन्सच्या माध्यमातून अनेक नाविण्यपूर्ण क्रांतीकारी गोष्टी उपलब्ध होतील ज्यांचा रूग्णांना खूपच फायदा होईल.

देशातील तसेच परदेशातील 350 सर्जननी या परिषदेत सहभाग घेतला. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..