झी५ चे मुंबईमध्ये 'हुक्ड टू ५' या तारांकित सोहळ्याचे आयोजन


झी५ वर बघायला मिळणार १११ पेक्षा जास्त नवीन कार्यक्रम

मुंबई, २२ मे २०२३: एक्सक्लुसिव्ह ओटीटी कन्टेन्ट निर्मितीची पाच वैभवशाली वर्षे साजरी करण्याच्या निमित्ताने मुंबई आयोजित करण्यात आलेल्या 'हुक्ड टू ५' या तारांकित सोहळ्यामध्ये झी५ ने या वर्षभरात नव्या शोजचा भरगच्च खजिना प्रस्तुत करणार असल्याचे सांगितले. यामध्ये हिंदी व क्षेत्रीय भाषांमधील ओरिजिनल्स, लोकप्रिय ठरलेल्या सिरीजचे पुढील भाग, अतिशय दमदार अशी डायरेक्ट टू डिजिटल रिलीजेस, ब्लॉकबस्टर नाटके आणि मनोरंजक डॉक्यु-सिरीजचा समावेश असणार आहे. लाखो मनोरंजन प्रेमींसाठी भारतभरातील विविध भाषांमधील वेगवेगळे कार्यक्रम प्रस्तुत करणाऱ्या झी५ ने या वर्षभरात ब्लॉकबस्टर कन्टेन्टचा भरगच्च खजिना सादर करणार असल्याची घोषणा केली आहे. हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बांगला, पंजाबी आणि मराठी भाषांमधील १११ पेक्षा जास्त कार्यक्रमांचा यामध्ये समावेश असणार आहे. संपूर्ण जगभरातील भारतीय आणि दक्षिण आशियायी दर्शकांच्या मनोरंजन गरजा व आवडीनिवडी पूर्ण करत पाच गौरवशाली वर्षे पूर्ण केल्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ झी५ने मुंबईमध्ये 'हुक्ड टू ५' या तारांकित सोहळ्याचे आयोजन केले होते.  बॉलिवूडमधील सेलिब्रेटीज व दिग्गज या सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थित होते.


श्री.मनीष कालरा, चीफ बिझनेस ऑफिसर, झी५ इंडिया यांनी सांगितले,"२०२३ मध्ये झी५ ची ५ गौरवशाली वर्षे पूर्ण होत असल्यामुळे हे वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. विविध भाषिक दर्शकांच्या आवडीचा, मनोरंजन विश्वातील सर्वोत्तम कन्टेन्ट सादर करून या पाच वर्षात आम्ही आमच्या दर्शकांची खूप वाहवा मिळवली आहे. ग्राहककेंद्री दृष्टिकोन अवलंबून आम्ही आमच्या कन्टेन्टची क्षितिजे सातत्याने विस्तारत आहोत. अधिकाधिक नवनवीन शैली, फॉरमॅट्स, भाषा आणि कथा यांचा समावेश करत आहोत. भरपूर मोठ्या दर्शक संख्येला मनोरंजन पुरवणारा प्लॅटफॉर्म या नात्याने कार्यक्रमांचा दर्जा उच्च राखला जाण्यावर आणि विविध टचपॉइंट्समार्फत ते उपलब्ध करवून देण्यावर आमचा नेहमीच भर असेल. या वर्षाची सुरुवात अतिशय प्रोत्साहक पद्धतीने झाली असून येत्या काळात १११ नवीन कार्यक्रमांना दर्शकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे."


श्री.पुनीत मिश्रा, प्रेसिडेंट-कन्टेन्ट व इंटरनॅशनल मार्केट्स, झी एंटरटेन्मेंट एन्टरप्रायजेस लिमिटेड यांनी सांगितले,"झी५ ला पाच वर्षे पूर्ण होत असल्याचा आनंद साजरा करताना आणि गेल्या पाच वर्षांमधील आमच्या वाटचालीचा आढावा घेताना आम्हाला हे जाणवते की, आजच्या युवा पिढीला आयुष्यातील स्थैर्यापेक्षा बदल जास्त रोमांचक वाटतात. कोणत्याही एकाच गोष्टीला चिकटून राहण्याऐवजी प्रत्येक दिशा, प्रत्येक वाट आजच्या पिढीला खुणावत असते, नवनवे बदल त्यांना हवेहवेसे वाटतात. आमच्या दर्शकांच्या आवडीनिवडी जपत, त्यांच्या गरजा पूर्ण करत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाण्याचे झी५चे मिशन आहे."

झी५ने धर्मा प्रॉडक्शन, सलमान खान फिल्म्स, गुनीत मोंगाज् सिख्या एंटरटेनमेंट, भानुशाली स्टुडिओ, द व्हायरल फीव्हर (टीव्हीएफ), गोल्डी बहलज् रोज ऑडिओ व्हिज्युअल्स, अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंट, सुधीर मिश्रा, विकास बहल, विवेक अग्निहोत्री आणि नागराज मंजुळे यांच्यासोबत सहयोग करार केला असून त्यामुळे दर्शकांना सलमान खान, पंकज त्रिपाठी, हुमा कुरेशी, सोनाली बेंद्रे, आर्या, विजय सेतुपती, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या अदाकारीचा आनंद घेता येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..