*भारतीय तायक्वांदाे संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा शिरगावकर विराजमान*

*दिल्लीचेही तख्त राखताे महाराष्ट्र माझा*

*नामदेव शिरगावकर यांची बिनविराेध निवड*

विशेष प्रतिनिधी | मुंबई

क्रीडा विश्वातील आपला कुशल नेतृत्वाचा दबदबा कायम ठेवताना नामदेव शिरगावकर पुन्हा एकदा भारतीय तायक्वांदाे फेडरेशनच्या अध्यक्षपदावर दिमाखदारपणे विराजमान झाले आहेत . त्यांची रविवारी बिनविराेध अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुंबई येथे भारतीय तायक्वांदाेच्या वतीने विशेष सर्व साधारण बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या बैठकीत  २५ राज्य संघटनेचे सदस्यही सहभागाी झाले हाेते. निवृत्त न्यायमुर्ती भगवंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक पार पडली. धर्मादाय आयुक्त शरद मांडके यांच्या सुचनेप्रमाणे गायवकवाड यांनी या निवडणुकीचे निरीक्षण केले.

यादरम्यान महाराष्ट्र ऑलम्पिक  संघटनेचे विद्यमान सचिव नामदेव  शिरगावकर यांच्या नावावर अध्यक्षपदाचा शिक्कामाेर्तब करण्यात आला.  पंजाबच्या वीणा अराेरा यांच्याकडे वरीष्ट उपाध्यक्षपदाची सुत्रे साेपवण्यात आली. त्यापाठाेपाठ तामिळनाडूचे साॅक्रेटिस यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

तसेच सेक्रेटरी जनरलपदी महाराष्ट्राच्या अमित धमाळ यांची नियुक्ती करण्यात आली. उत्तर प्रदेशचे रजत दीक्षित हे खजिनदार असतील. कार्यकारी समिती सदस्यपदी आसामच्या गितीका तालुकदार आणि गुजरातच्या विकास कुमार यांची निवड करण्यात आली. 

*पुन्हा एकदा तायक्वांदाेमध्ये भारताचे वर्चस्व राहणार : शिरगावकर*

तायक्वांदाे खेळ प्रकारात जागतिक स्तरावर आता पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहणार आहे. यासाठी आम्ही खास पद्धतीने तंत्रशुद्ध प्रशिक्षणांसह खास प्रशिक्षकांची निवड करणार आहाेत. तसेच या युवांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी माेठ्या संख्येत स्पर्धां आयाेजावर आमचा भर असेल. यातून देशभरातील युवांना यातून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची माेठी संधी मिळेल. याशिवाय देशाच्या कानाकाेपऱ्यात गुणवंत असे तायक्वांदाेचे खेळाडू तयार हाेतील, अशी प्रतिक्रीया नवनियुक्त अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी विजयानंतर दिली.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..