आईसीएसी आणि जे एस आर्ट गॅलरी आयोजित

द आर्ट फेअर

दि. १ ते ४ जून, २०२३ हया दरम्यान नेहरू सेंटर मध्ये

भारतातील विविध कलादाने व नामांकित चित्रकारांचा समावेश

 

आईसीएसी आणि जे एस आर्ट गॅलरी आयोजित भव्य कला महोत्सव द आर्ट फेअर चे आयोजन दि. १ ते ४ जून, २०२३ हया दरम्यान करण्यात आले आहे. हा भव्य कला महोत्सव मुंबईच्या वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर मध्ये भरविण्यात आला असून ११ ते ७ हया वेळेत रसिकांना पाहायला मिळणार आहे. हया कला मेळाव्याचे उद्घाटन गुरुवार दि. १ जून, २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून याप्रसंगी कला आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ४०० पेक्षा जास्त चित्रकार व शिल्पकार भाग घेणार असून त्यांच्या १५०० च्यावर कलाकृतींचा व ५० विविध कलादालनांचा समावेश करण्यात आला आहे.

इंटरनेशनल क्रिएटिव आर्ट सेंटर (आईसीएसी) चे संस्थापक श्री. रविंद्र मारडिया व जे एस आर्ट गॅलरीचे संस्थापक श्री. सूरज लाहेरू यांनी आयोजित्त केलेल्या हया कला महोत्सवात अनेक प्रथितयश तसेच समकालीन चित्रकार व शिल्पकार यांच्या तैलरंग, जलरंग, अक्रीलिक, चारकोल, मिक्स मीडियम, ब्रोंझ, फोटोग्राफी, धातुशिल्प वास्तववादी आणि निम्न वास्तववादी तसेच अमूर्त शैलीतील कलाकृतींचे सादरीकरण होणार आहे. विद्यमान कलाजगतातील चित्रकारांच्या व शिल्पकारांच्या विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण अशा १५०० च्यावर कलाकृती बघण्याची सुवर्णसंधी सर्व कलाप्रेमी व रसिकांना हया कला मेळाव्यात पहायला मिळणार आहे. त्याचबरोबर हया प्रदर्शनात अनेक चित्रकारांचा लाईव्ह डेमो पाहायला मिळणार असून कला परीक्षकांद्वारा निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट अशा चित्रकार व शिल्पकारांना पुरस्कार दिले जाणार आहेत.   

सदर कला महोत्सवात राबी आर्ट गॅलरी (शांतिनिकेतन), डोलना आर्ट गॅलरी (मुंबई), तूलिका आर्ट गॅलरी (मुंबई), एमिनेंट आर्ट गॅलरी (दिल्ली), गॅलरी 16 (दिल्ली), जेड आर्ट गॅलरी (मुंबई), डेसर्ट आर्ट गॅलरी (दुबई), कला संस्कृती आर्ट गॅलरी (मुंबई), प्राची आर्ट गॅलरी (मुंबई), श्रीजन आर्ट गॅलरी (नवी मुंबई) हया आर्ट गॅलरीचा समावेश असून रबींद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, बिनोद बिहारी मुखर्जी, रामकिंकर बैज, एम एफ हुसैन, एफ एन सौजा, गणेश पायने, सोमनाथ हारे, सुहास रॉय, शक्ति बर्मन, जामिनी रॉय, बिकास भट्टाचार्य, लालू प्रसाद शॉ, के जी सुब्रमनियन, के लक्ष्मण गौड़, जोगेन चौधुरी, बोस कृष्णामाचारी, माधवी पारीख, परेश माइटी या नामांकित चित्रकारांच्या कलाकृती पाहायला मिळतील. हा कला महोत्सव दि. १ ते ४ जून, २०२३ हया कालावधीत रोज ११ ते ७ हया वेळेत रसिकांना विनामुल्य पाहायला मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..