गव्हाच्या बाजारपेठेत ‘अदानी विल्मार’ चा प्रवेश

गव्हाच्या बाजारपेठेत 'अदानी विल्मार' चा प्रवेशफॉर्च्युनच्या शुद्ध गव्हाच्या जाती दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान येथे उपलब्ध केले जाणार

मुंबई, २६ मे २०२३ – अदानी विल्मार या भारतातील सर्वात मोठ्या फूड एफएमसीजी कंपन्यांपैकी एका कंपनीने आपला फॉर्च्युन हा ब्रँड गव्हाच्या बाजारपेठेत उतरत असल्याचे आज जाहीर केले आहे. कंपनीतर्फे देशातील दर्जेदार आणि शुद्ध गव्हाच्या जाती उदा. शरबती गहू, पूर्णा १५४४, लोकवन आणि एमपी ग्रेड १ उपलब्ध केल्या जाणार आहेत.

गव्हाच्या बाजारपेठेत नवा मापदंड स्थापन करण्याचे ध्येय फॉर्च्युनने ठेवले आहे. कंपनी शरबती गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील सिहोर व त्यासारख्या इतर प्रदेशांतून सर्वोत्तम गहू मिळवणार आहे. शेतीच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धती व अनोख्या हवामानाच्या मदतीने सोनेरी रंगाचा हा वजनदार गहू सिहोरमध्ये पिकवला जातो. त्याच्या पिठापासून बनणारी पोळी चवदार आणि मऊसूत असते. गव्हाच्या या जातींचे एडब्ल्यूएलच्या कठोर निकषांवर मोजमाप करून शुद्धतेची खात्री केली जाणार आहे.

श्री. विनीत विश्वंभरम, उपाध्यक्ष, सहकारी-विक्री आणि विपणन विभाग, अदानी विल्मार म्हणाले,‘‘पश्चिम आणि उत्तर भागांतील जुन्या घरांत गव्हाची बारकाईनं पारख करून मगच निवड केली जाते. या गव्हाचे घराजवळच्या गिरणीत आपल्या देखरेखीखाली पीठ बनवून घेण्याची परंपरा तिथे जपली जाते. फॉर्च्युनची गव्हाची श्रेणी त्यांना गव्हाचे हवे ते सर्व गुणधर्म देणारी आहे. उच्च दर्जा व भरपूर वैविध्य यामुळे ही श्रेणी वेगळी ठरेल. बाजारपेठेत भेसळमुक्त आणि चांगल्या गव्हाची उणीव आहे. आमची पोषक आणि भेसळमुक्त उत्पादने देशभरातील ग्राहकांना नवा अनुभव देतील.’’

फॉर्च्युन हा ब्रँड विश्वास, शुद्धता व दर्जा यांच्या पायावर उभारला आहे. उत्पादन श्रेणीचा विस्तार करून ग्राहकांना दर्जेदार उत्पादने पुरवण्याचे आमचे ध्येय आहे. कंपनी सातत्याने बाजारपेठेतील आपला हिस्सा विस्तारत असून नवी दिल्ली, मुंबई, पुणे, सूरत आणि अहमदाबादसारख्या मोठ्या शहरांत स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..