मोटोरोलाकडून एज ४० लॉन्‍च..

मोटोरोलाकडून एज ४० लॉन्‍च – आयपी६८ अंडरवॉटर प्रोटेक्‍शन, १४४ हर्ट्झ ३डी कर्व्‍ह डिस्‍प्‍ले, जगातील पहिले मीडियाटक डायमेन्सिटी ८०२० असलेल्‍या जगातील स्लिमेस्‍ट ५जी फोनसह भारतातील स्‍मार्टफोन बाजारपेठेत निर्माण केला धुमाकूळ, किंमत फक्‍त २९,९९९ रूपये 

  • मोटोरोला एज ४० जगातील स्लिमेस्‍ट* ५जी स्‍मार्टफोन (७.५८ मिमी) आहे, ज्‍यामध्‍ये आयपी६८ अंडरवॉटर प्रोटेक्‍शन आणि अविश्‍वनीयरित्‍या प्रिमिअम डिझाइनसह पीयू वेगन लेदर फिनिश, तसेच सँडब्‍लास्‍टेड ॲल्‍युमिनिअम मेटल फ्रेम आहे.
  • मोटोरोला एज ४० एकसंधी कार्यक्षमतेसाठी अत्‍यंत गतीशील मीडियाटेक डायमेन्सिटी ८०२० प्रोसेसरची शक्‍ती आणि सेगमेंट फर्स्‍ट १४४ हर्ट्झ कर्व्‍ह डिस्‍प्‍ले असलेला जगातील पहिला स्‍मार्टफोन आहे.
  • एफ/१.४ चे फ्लॅगशिप ग्रेड कॅमेरा अर्पेचर असलेल्‍या मोटोरोला एज ४० मध्‍ये ५० मेगापिक्‍सल प्रगत कॅमेरासह ओआयएस   um अल्‍ट्रा पिक्‍सल तंत्रज्ञान, इन्‍स्‍टण्‍ट ऑल-पिक्‍सल फोकस आणि होरिझोन-लॉक आहे, ज्‍यामुळे कोणत्‍याही प्रकाश स्थितीत आकर्षक फोटो व व्हिडिओज कॅप्‍चर करता येतात.
  • तसेच मोटोरोला एज ४० वायरलेस चार्जिंग सपोर्ट व ईसिम कॉम्‍पेटिबिलिटी असलेला त्‍याच्‍या विभागातील पहिला स्‍मार्टफोन आहे.
  • मोटोरोला एज ४० स्मार्टफोन ३० मे दुपारी १२ वाजल्‍यापासून फ्लिपकार्ट, Motorola.in वर आणि प्रमुख रिटेल स्‍टोअर्समध्‍ये फक्‍त २९,९९९ रूपये या किंमतीत उपलब्‍ध असेल.
  • ग्राहक फक्‍त २७,९९९ रूपयांपासून (२००० रूपयांच्‍या एक्‍स्‍चेंज बोनस ऑफरसह) सुरू होणाऱ्या अद्भुत ऑफर किंमतीत किंवा आघाडीच्‍या बँकांकडून नो कॉस्‍ट ईएमआयसह प्रतिमहिना फक्‍त ५,००० रूपयांमध्‍ये हा स्‍मार्टफोन खरेदी करू शकतात.
  • विशेषत: फ्लिपकार्टवर ३० मे पूर्वी बुक केल्‍यास ग्राहक ९५०० रूपयांच्‍या स्क्रीन डॅमेज प्रोटेक्‍शनच्‍या लिमिटेड पीरियड प्री-ऑर्डर ऑफरचा देखील लाभ घेऊ शकतात.  

मुंबई, २३ मे २०२३ – मोटोरोला या भारतातील सर्वोत्तम ५जी स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने आज त्‍यांच्‍या प्रिमिअम एज फ्रँचायझीमधील नवीन स्‍मार्टफोन मोटोरोला एज ४० च्‍या लॉन्‍चची घोषणा केली. ब्रॅण्‍डने जगातील अनेक पहिल्‍या व सेगमेंट फर्स्‍ट वैशिष्‍ट्यांनी युक्‍त या स्‍मार्टफोनच्‍या लॉन्‍चसह भारतीय स्‍मार्टफोन बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण केला आहे.

एज ४० हा आयपी६८ रेटेड अंडरवॉटर प्रोटेक्‍शन असलेला जगातील स्लिमेस्‍ट ५जी स्‍मार्टफोन आहे. सुपर स्लिम असण्‍यासोबत हा स्‍मार्टफोन वजनाने हलका देखील आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये प्रिमिअम वेगन लेदर फिनिशसह मेटल फ्रेम आहे, ज्‍यामधून कोमल स्‍पर्शासह मजबूत ग्रिपची खात्री मिळते. हा स्‍मार्टफोन आकर्षक रंगांसह (हिरवा व काळा) येतो. तसेच हा स्‍मार्टफोन निळ्या रंगामधील पीएमएमए ॲक्रिलिक ग्‍लास फिनिशच्‍या पर्यायासह देखील येतो. आयपी६८ वैशिष्‍ट्य नकळतपणे स्‍मार्टफोन पाण्‍यामध्‍ये पडल्‍यामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत चिंता न करता साहसाने भरलेल्‍या जीवनाचा आनंद घेणाऱ्यांसाठी हा योग्‍य स्‍मार्टफोन असल्याची खात्री देते. स्‍टाइल व कार्यक्षमतेचे उत्तम संयोजन असलेल्‍या एज ४० मध्‍ये जगातील पहिले मीडियाटेक डायमेन्सिटी ८०२० प्रोसेसरसह सेगमेंट फर्स्‍ट १४४ हर्ट्झ ३डी कर्व्‍ह डिस्‍प्‍ले (६.५५ इंच पीओएलईडी एचडीआर१०+) आहे. तसेच स्‍मार्टफोनमध्‍ये व्‍यापक एफ/१.४ अर्पेचरसह अविश्‍वसनीय ५० मेगापिक्‍सल कॅमेरा सेटअप आहे. ओआयएस व फ्लॅगशिप ग्रेड वैशिष्‍ट्ये जसे होरिझोन लॉक कोणत्‍याही प्रकाशस्थितीत आकर्षक फोटो व व्हिडिओज कॅप्‍चर करण्‍याची खात्री देतात.

कार्यक्षमतेसंदर्भात मोटोरोला एज ४० मध्‍ये अत्‍यंत गतीशील मीडियाटेक डायमेन्सिटी ८०२० चिपसेट आहे, जी गतीशील फ्रेम रेट्ससह सुलभ गेमिंग अनुभव देते आणि ५जी व वाय-फाय नेटवर्क्‍सवर उच्‍च रिझॉल्‍यूशन व्हिडिओेसह फास्‍ट डाऊनलोड स्‍पीड्सची खात्री देते. ही डायमेन्सिटी ८०२० चिपसेट गतीशील सीपीयू व जीपीयू स्‍पीड्स आणि उच्‍च ऊर्जा कार्यक्षमता देते, ज्‍यामुळे दैनंदिन टास्‍क्स सुलभपणे करता येण्‍यासोबत दीर्घकाळापर्यंत बॅटरी बॅकअपची खात्री मिळते. सुलभ मल्‍टीटास्किंगसाठी ८ जीब‍ी रॅम आणि २५६ जीबी यूएफएस ३.१ स्‍टोरेजसह ग्राहकांना फोटो, चित्रपट, गाणी, ॲप्‍स व गेम्‍ससाठी व्‍यापक स्‍टोरेज क्षमता मिळते. भारतात सर्वोत्तम ५जी स्‍मार्टफोन्‍स प्रदान करण्‍याच्‍या आपल्‍या कटिबद्धतेशी बांधील राहत मोटोरोला एज ४० त्‍यासंदर्भात अपवाद नाही, ज्‍यामध्‍ये एकसंधी व जलद कनेक्‍टीव्‍हीटीसाठी १४ ५जी बॅण्‍ड्स, ३ कॅरियर अग्रेगेशन आणि वाय-फाय ६ आहे.

तसेच, कन्‍टेन्‍ट स्ट्रिमिंगसाठी आणि गेम्‍स खेळण्‍यासाठी मोठा, आकर्षक डिस्‍प्‍ले असलाच पाहिजे आणि मोटोरोला एज ४० मध्‍ये ६.५५ इंच १४४ हर्ट्झ पीओएलईडी डिस्‍प्‍ले आहे, ज्‍यामध्‍ये सर्वसमावेशक दृश्‍यासाठी बॉर्डरलेस ३डी कर्व्‍ह कडा आहेत. सर्वोत्तम डिस्‍प्‍ले फुल एचडी+ रिझॉल्‍यूशनसह परिपूर्ण आहे, ज्‍यामधून कमी पिक्‍सलेशनसह शार्पर पिक्‍चरची खात्री मिळते. तसेच अधिक वै‍विध्‍यपूर्ण व वास्‍तविक दिसणाऱ्या रंगांच्‍या व्‍यापक श्रेणीसाठी एचडीआर१०+ प्रमाणन व डीसीआय-पी३ कलर रेंज आहे. गेमिंग, स्‍क्रॉलिंग किंवा मल्‍टीटास्किंगच्‍या वेळी ग्राहक त्‍यांचा डिवाईस सुलभपणे नेव्हिगेट करण्‍यासाठी गतीशील व सुलभ १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटचा देखील लाभ घेऊ शकतात. सिनेमॅटिक व्‍युईंग अनुभवाला डॉल्‍बी ॲटमॉस® सह सर्वोत्तम ऑडिओची जोड आहे, जे श्रोत्‍यांना डिवाईसच्‍या स्टिरिओ स्‍पीकर्सच्‍या किंवा हेडफोन्‍सच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या आवडत्‍या मनोरंजनाचा आनंद घेताना अधिक डेप्‍थ, क्‍लेरिटी व डिटेल्‍ससह संपन्‍न ऑडिओ अनुभव देते. तसेच मोटोरोला स्‍पॅटियल साऊंड वापरकर्त्‍यांच्‍या हेडफोन्‍समधून किंवा स्‍पीकर्समधून सुस्‍पष्ट आवाज ऐकू येण्‍याची खात्री देते. हे वैशिष्‍ट्य गाणी ऐकताना किंवा गेम्‍स खेळताना आसपासचे वातावरण आनंदमय करते. एकूण, मोटोरोला एज ४० डिस्‍प्‍ले व ऑडिओ ऑफरिंग्‍ज लक्षवेधक व वास्‍तविक मनोरंजन अनुभव देतात.

फोटोग्राफीप्रेमींसाठी स्‍मार्टफोनमध्‍ये प्रगत कॅमेरा सिस्‍टमसह एफ/१.४ च्‍या स्‍मार्टफोनमध्‍ये उपलब्‍ध व्‍यापक अर्पेचर असलेला ५० मेगापिक्‍सल मेन कॅमेरा, फास्‍ट-फोकसिंग ॲम्बियण्‍ट लाइट सेन्‍सर, ओआयएस आणि व्‍यापक २.० μm अल्‍ट्रा पिक्‍सल आहे, जे शार्पर फोटोंसाठी अनेक रंगसंगती कॅप्‍चर करते. तसेच स्‍मार्टफोनमध्‍ये १३ मेगापिक्‍सल अल्‍ट्रावाइड कॅमेरासह मॅक्रो व्हिजन आहे, ज्‍यामुळे सर्वजण फ्रेममध्ये मावतात किंवा प्रत्‍येक बाब बारकाईने कॅप्‍चर होते. तसेच ३२ मेगापिक्‍सल हाय-रिझॉल्‍यूशन सेल्‍फी कॅमेरा सर्व प्रकाशस्थितीत आकर्षक ग्रुप किंवा सोलो फोटोज कॅप्‍चर होण्‍याची खात्री देतो. याव्‍यतिरिक्‍त वापरकर्त्‍यांना त्‍यांची सर्जनशीलतेचा अधिकाधिक वापर करता येण्‍यासाठी होरिझोन लॉक स्‍टेबिलायझेशन, व्हिडिओ पोर्ट्रेट, ऑडिओ झूम व व्‍हीलॉग मोड यांसारखी अनेक फ्लॅगशिप ग्रेड कॅमेरा वैशिष्‍ट्ये आहेत. होरिझोन लॉक हे आणखी एक सेगमेंट फर्स्‍ट वैशिष्‍ट्य आहे आणि ओआयएसचा दर्जा वाढवतो, जो कॅमेऱ्याला ३६० अंशामध्‍ये फिरत असताना देखील स्थिर ठेवत सुरेखरित्‍या ॲक्‍शन शॉट्स कॅप्‍चर करतो. ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना शेकी व्हिडिओबाबत चिंता करण्‍याची गरज नाही. तसेच लेटन्सीशिवाय प्रक्रिया रिअल-टाइममध्‍ये घडते, ज्‍यामधून सुस्‍पष्‍ट फोटोज कॅप्‍चर होण्‍याची खात्री मिळते.

याव्‍यतिरिक्‍त स्‍मार्टफोनमध्‍ये शक्तिशाली ४४०० एमएएच बॅटरी आहे, जी दीर्घकाळापर्यंत टिकते, ज्‍यामुळे हा स्‍मार्टफोन आजच्‍या पिढीच्‍या गतीशील जीवनशैलीला साजेसा आहे. ६८ वॅट टर्बोपॉवरTM चार्जिंग देखील वापरकर्त्‍यांना फक्‍त १० मिनिटांमध्‍ये फोन रिचार्ज करण्‍याची सुविधा देते, ज्‍यामुळे स्‍मार्टफोन दिवसभर वापरता येण्‍याची खात्री मिळते. हा स्‍मार्टफोन बॉक्‍समध्‍ये शक्तिशाली ६८ वॅट चार्जर व सी२सी केबलसह येतो, ज्‍यामुळे या स्‍मार्टफोनच्‍या माध्‍यमातून इतर डिवाईसेसना रिव्‍हर्स चार्जिंग देखील शक्य होते. अतिरिक्‍त सोयीसुविधेसाठी १५ वॅट वायरलेस चार्जिंगचा पर्याय देखील आहे, ज्‍यामुळे वायरलेस चार्जिंग असलेला मोटोरोला एज ४० या विभागातील पहिला व एकमेव स्‍मार्टफोन आहे. 

हा क्रांतिकारी डिवाईस आधुनिक अँड्रॉईड १३ वर संचालित आहे आणि मोबाइल सुरक्षिततेसाठी मोटो सेक्‍युअर व थिंकशील्‍डसह सुधारित सुरक्षितता देतो. मोटो सेक्‍युअर वापरकर्त्‍याच्‍या स्‍मार्टफोनवरील सर्व महत्त्वाच्‍या सुरक्षितता व गोपनीय वैशिष्‍ट्यांसाठी पसंतीचे गंतव्‍य आहे. या वैशिष्‍ट्यासह वापरकर्ते नेटवर्क सुरक्षिततेचे व्‍यवस्‍थापन करू शकतात, ॲप परमिशन्‍स नियंत्रित करू शकतात आणि त्‍यांच्‍या सर्वात संवेदनशील डेटासाठी सिक्रेट फोल्‍डर देखील तयार करू शकतात.

हा ईसिम पर्याय असलेला त्‍याच्‍या विभागातील पहिला अँड्रॉईड स्‍मार्टफोन देखील आहे. हे वैशिष्‍ट्य डिवाईस व सिमदरम्‍यान सर्वोत्तम सुरक्षितता व डेटा एन्क्रिप्‍शन देते. या स्‍मार्टफोनमध्‍ये फिजिकल सिम सपोर्टसह ई-सिम देखील आहे, ज्‍यामुळे हा ड्युअल सिम स्‍मार्टफोन आहे. वापरकर्त्‍यांचा एकूण स्‍मार्टफोन अनुभव वाढवण्‍यासाठी मोटोरोला एज ४० मध्‍ये विशेष वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे रेडी फॉर आणि फॅमिली स्‍पेसेस. रेडी फॉर वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना त्‍यांचा स्‍मार्टफोन वायरलेस्‍ली टीव्‍हीशी कनेक्‍ट करून मोबाइल गेम्‍स खेळण्‍याची, व्हिडिओ कॉल्‍स करण्‍याची आणि मोठ्या पडद्यावर स्‍मार्टफोनच्‍या ॲप्‍सचा वापर करण्‍याची सुविधा देते. फॅमिली स्‍पेसेस वैशिष्‍ट्य मोटोरोला वापरकर्त्‍यांना दुरूनच नियंत्रण ठेवण्‍यासाठी, विशिष्‍ट ॲप्‍सच्‍या इंटरफेसची निवड करण्‍यासाठी, पालकांचे नियंत्रण ठेवण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या स्‍मार्टफोनवर ॲप्‍सचा वापर करत इतर वापरकर्त्‍यांच्‍या, विशेषत: लहान मुलांच्‍या स्‍मार्टफोन वापराचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी दुसऱ्या मोटोरोला स्‍मार्टफोन वापरकर्त्‍याच्‍या स्क्रीनचे दुरूनच नियंत्रण करण्‍याची सुविधा देते.

या लॉन्‍चबाबत आपले मत व्‍यक्‍त करत मोटोरोला एशिया पॅसिफिकचे कार्यकारी संचालक श्री. प्रशांत मणी म्‍हणाले, ‘‘मोटोरोला एज ४० मध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, अद्वितीय डिझाइन व सॉफ्टवेअर अनुभवांचे परिपूर्ण मिश्रण आहे, जे ग्राहकांच्‍या बदलत्‍या मागण्‍यांची पूर्तता करतात. हा स्‍मार्टफोन ग्राहकांना दर्जात्‍मक स्‍मार्टफोन अनुभव देण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो, ज्‍यामुळे ते आजच्‍या गतीशील युगामध्‍ये अग्रणी राहण्‍यास सक्षम होतात. आम्‍हाला विश्‍वास आहे की हा स्‍मार्टफोन भारताच्‍या स्‍मार्टफोन बाजारपेठेतील गेम चेंजर असेल, त्‍याच्‍या विभागासाठी नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करेल.’’

किफायतशीर किंमत व आकर्षक वैशिष्‍ट्यांसह मोटोरोला एज ४० इतरांपेक्षा वरचढ ठरणारा डिवाईस आहे, जो तंत्रज्ञान उत्‍साही, गेमर्स, सुरक्षिततेबाबत जागरूक ग्राहक किंवा आपल्‍या स्‍टाइलला ॲक्‍सेसराइज करू पाहणारे व्‍यक्‍ती अशा विविध ग्राहकवर्गाचे लक्ष वेधून घेतो.

उपलब्‍धता व किंमत

मोटोरोला एज ४० वेगन लेदर फिनिशमधील रेसेडा ग्रीन  एक्लिप्‍सी ब्‍लॅक आणि पीएमएमए (ॲक्रिलिक ग्‍लास) फिनिशमधील लुनार ब्‍ल्‍यू या तीन आकर्षक रंगांच्‍या व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. स्‍मार्टफोनची विक्री ३० मे २०२३ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून Motorola.in वर आणि प्रमुख रिटेल स्‍टोअर्ससह रिलायन्‍स डिजिटलमध्‍ये सुरू होईल.   

लॉन्‍च किंमत: २९,९९९ रूपये

उत्‍पादन २३ मे दुपारी १२ वाजल्‍यापासून फ्लिपकार्टवर प्री-ऑर्डरसह देखील उपलब्‍ध असेल.

किफायतशीर ऑफर्स:

ग्राहक डिवाईस खरेदी करण्‍यासाठी खालील दोन ऑफर्समधून निवड करू शकतात:

  1. एक्‍स्‍चेंजवर २,००० रूपयांची अतिरिक्‍त सूट – ज्‍यामुळे उत्‍पादनाची प्रभावी किंमत २७,९९९ रूपये
  2. एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय व ॲक्सिस बँक कार्ड्सवर जवळपास ६ महिन्‍यांपर्यंत नो कॉस्‍ट ईएमआय – ज्‍यामुळे प्रभावी मालकीहक्‍क खर्च प्रति महिना ५,००० रूपये

एक्‍सक्‍लुसिव्‍ह प्री-ऑर्डर ऑफर:

प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ९५०० रूपये किंमतीचा एक-वेळ स्क्रीन रिप्‍लेसमेंट मिळण्‍यासाठी विशेष स्क्रीन डॅमेज प्रोटेक्‍शन प्‍लान मिळतो. ही ऑफर फक्‍त फ्लिपकार्टवर उपलब्‍ध आहे आणि ३० मे २०२३ सकाळी ११.५९ पर्यंत वैध आहे.

उत्‍पादनाबाबत अधिक माहितीसाठी भेट द्या:

फ्लिपकार्ट – https://www.flipkart.com/motorola-edge40-f23eewg3-coming-soon-store

मोटोरोला वेबसाइट – https://www.motorola.in/smartphones-motorola-edge-40/p

ऑपरेटर ऑफर्स:

ग्राहक रिलायन्‍स जिओकडून ३१०० रूपयांच्‍या अतिरिक्‍त लाभांचा आनंद घेऊ शकतात.

यामध्‍ये १०० रूपयांच्‍या अतिरिक्‍त ५जी डेटाचे १०० जीबी (प्रतिमहिना १० जीबी), तसेच एजिओ, इक्गिो, ईटी प्राइम यांच्‍याकडून १०५० रूपयांच्‍या पार्टनर ऑफर्स यांचा समावेश आहे. 

ऑफरबाबत अधिक माहितीसाठी: www.jio.com/en-in/jio-motorola-edge40-offer-2023

*अटी व नियम लागू: प्रभावी किंमतीसह लिमिटेड पीरियड एक्‍स्‍चेंज.

**फ्लिपकार्ट स्क्रीन डॅमेज प्रोटेक्‍शन प्‍लाननुसार अटी व नियम लागू.  

Operating System

Android 13. (Assured upgrade to Android 14 and 15 + 3 years of security updates)

System Architecture / Processor

MediaTek Dimensity 8020 processor with 2.6GHz octa-core CPU and Mali G77 MC9

Memory (RAM)

8GB LPDDR4x

Storage (ROM)

256GB built-in | UFS 3.1

Body

Front: Curved 3D glass with anti-fingerprint coating
Frame: Sandblasted aluminum
Rear: Curved inlay; vegan leather or matte acrylic

Dimensions

158.43 x 71.99 x 7.58mm (PU/Vegan leather)
158.43 x 71.99 x 7.49mm [PMMA/Acrylic]

Weight

171g [PU/Vegan Leather]
167g [PMMA/Matte Acrylic]

Water protection*

IP68

Display

144Hz, 6.55" display, FHD+ pOLED, 1200nits brightness

Display Screen-to-body ratio

Active Area-Touch Panel (AA-TP): 92.7%

Display certifications

HDR10+
Amazon HDR playback
Netflix HDR playback
SGS Low Blue Light
SGS Low Motion Blur

Battery

4400 mAh

Charging

TurboPower™ 68 Wired
15W Wireless

Bands (by model)*

14 5G bands: n1/2/3/5/7/8/20/28/38/40/41/66/77/78
4G: B1/2/3/4/5/7/8/12/13/17/20/26/28/32/38/39/40/41/42/43/66
3G: B1/2/4/5/8
2G: B2/3/5/8

Rear Camera

50MP with OIS (f/1.4 aperture wide apperture, 2um Ultra Pixel, Omni-directional PDAF)

Rear Camera

13MP Ultrawide angle + Macro Vision

Camera Sensor

Ambient Light Sensor

Flash

Single LED flash

Rear camera video capture

Rear Main Camera: 
4K UHD (30fps), FHD (60/30fps)
Slow motion: HD (240/120fps)

Rear Ultra-wide/Macro Camera:
4K UHD (30fps), FHD (30fps)

Front camera hardware*

32MP Sensor (f/2.4 aperture | 1.4um Quad Pixel)

Front camera video capture

4K UHD (30fps), FHD (30fps)

Portrait Video: HD (30fps)

SIM Card

Dual SIM (pSIM+eSIM)

FM Radio

Yes

Speakers

Dual stereo speakers
Tuning by Dolby Atmos™

Microphones

3

Bluetooth® Technology

Bluetooth® 5.2

Wi-Fi

Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ax
2.4 GHz | 5 GHz
Wi-Fi 6
Wi-Fi hotspot

Ports

Type-C port (USB 2.0)

NFC

Yes

Location Services

GPS, A-GPS, LTEPP, SUPL, GLONASS, Galileo, Beidou

Sensors

Fingerprint on display reader, Proximity, Accelerometer, Ambient Light, SAR sensor, Sensor Hub, E-Compass

Security

On-screen fingerprint reader
Face unlock
ThinkShield®
Moto Secure

Inbox Accessories*

Protective cover, charger, USB cable, guides, SIM tool

My UX

Personalize: Theme, Wallpaper
Display: Peek Display, Attentive Display
Gestures: Quick Capture, Fast Flashlight, Three-Finger Screenshot, Flip for DND, Pick Up to Silence, Lift to Unlock, Swipe to Split, Quick Launch
Play: Media Controls, Gametime
Tips: Take a Tour, What's New in Android 13

Upgrades

2 Assured OS Upgrades (Android 14, 15)
3 Years of SMRs

Other Services

Family Spaces, Ready for

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..